Golmaal 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Golmaal 5: गोलमालचा सिक्वेल कधी येणार? श्रेयसने दिली मोठी अपडेट; म्हणाला....

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Golmaal Sequal: कॉमेडी चित्रपट गोलमाल चे नाव देखील ऐकले तरी हसू आवरत नाही. गोलमाल चित्रपटाच्या सिक्वेलने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, आतापर्यत या चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर प्रेक्षक आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी माहिती दिली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेने नुकताच एका मुलाखतीत त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. श्रेयसने त्याला पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल असे सांगितले आहे. यामुळे केवळ चाहतेच नाही तर चित्रपटातील सर्व कलाकार देखील श्रेयसच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. आगामी काळात अभिनेता श्रेयस आणि रोहित शेट्टी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Latest Entertainment News)

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत श्रेयसने रोहित शेट्टीसोबत काम करणार असल्याचे म्हटलं आहे. त्याने गोलमालच्या सिक्वेलबाबत खुलासा केला आहे. खरंतर, रोहित शेट्टीने देखील त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते, की तो लवकरच 'गोलमाल-5' घेऊन परतेल, जो २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल रिटर्न्सचा सिक्वेल असेल. चित्रपटात रोहित शेट्टीसह अजय देवगण, अर्शद वारसी, करिना कपूर आणि तुषार कपूर होते.

पुढे श्रेयसने मी देखील खूप आनंदी आहे, कोरोना पूर्वीच रोहित आणि अजयने चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोठा खंड पडला. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू आहे. लवकरच निर्माते चित्रपटाबाबत अधिकृतपणे माहिती देतील

गोलमाल ४ चित्रपट शूटिंगच्या दिवसांना उजाळा देत श्रेयसने, सेटवरच्या मजेदार वातावरणाचे किस्से सांगितले आहे. पुढे त्याने हे केवळ रोहित शर्मामुळे शक्य झाले असल्याचे म्हटलं आहे. मला हे माहित आहे की, जोपर्यंत रोहित चित्रपट बनवत राहील तोपर्यंत तो गोलमाल चित्रपट देखील बनवेल असा विश्वास आहे

रोहित शेट्टीच्या गोलमाल पहिला चित्रपट२००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात शर्मन जोशी, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. आणि यानंतर रोहित शेट्टीने ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले.

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT