Adah Sharma Marathi Poem: अदाने अस्खलीत मराठीत सांगितली इडलीची गोष्ट; व्हिडिओ होतोय व्हायरल

Adah Sharma Viral Video: अदा शर्माने ३ मार्चला तिचा ब्रेकफास्ट करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Adah Sharma Viral Video
Adah Sharma Viral VideoSaam Tv
Published On

Adah Sharma Share Video: 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आहे. सध्या अदा शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदाने मराठीमध्ये एक कविता केली आहे. तिचा हा कवितेचा व्हिडिओ जुना असून आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अदा शर्माने ३ मार्चला तिचा ब्रेकफास्ट करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती इडली खाताना दिसत आहे. तर इडली खाताना तिने कविता म्हटली आहे. 'एक होती इडली, ती होती चिडली. धावत धावत सांबारात बुडाली....' अशी कविता अदाने केली आहे. कविता पोस्ट करत अदाने या मागची कथा सांगितली आहे. (Latest Entertainment News)

Adah Sharma Viral Video
Gaurav More Post: आने वाला पल जाने वाला है... म्हणत हास्यजत्रा फेम गौरव मोरेने केली भावुक पोस्ट, कारण ऐकून धक्का बसेल

अदाने लिहिले आहे, खुप गॉड आहे, नंतर डिलीट करेन. 'स्नेहलने मला ही कविता शिकवली आहे. जेणेकरून मी डिस्ट्रक्ट होईन आणि एका जागी बसेन. ज्यामुळे तिला माझी हेअर स्टाईल करता येईल.'

'द केरला स्टोरी' या चित्रपटाला भारतात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मुसंडी मारली आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १८७. ४७ कोटी इतके झाले आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट बॅन आहे. तर भारतातील काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. काल या चित्रपटाचे पुण्यातील एफटीआयमध्ये स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. परंतु एफटीआयमधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने या चित्रपटाला विरोध केला. पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग सुरळीत पार पडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com