Ankur Wadhave News: 'प्रिय बायको...'; अंकुर वाढवेने बायकोला वाढदिवसानिमित्त दिलं खास 'रोमँटिक सरप्राइज'

Ankur Wadhave News: रोमँटिक सरप्राइज' अभिनेता अंकुर वाढवेने त्याच्या बायकोला वाढदिवसानिमित्त दिलं आहे.
Ankur Wadhave News
Ankur Wadhave NewsSaam tv

Ankur Wadhave News: कलाकर म्हटलं की त्यांचं दिवसभराचं वेळापत्रक फारच व्यग्र असतं. कलाकरांना या चित्रीकरणासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. तरीही मात्र काही अभिनेते, कलाकार वेळात वेळ काढून त्यांच्या प्रिय माणसाला सरप्राइज देत असतात. असंच रोमँटिक सरप्राइज' अभिनेता अंकुर वाढवेने त्याच्या बायकोला वाढदिवसानिमित्त दिलं आहे. (Latest Marathi News)

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे अंकुर घराघरात पोहोचला. अंकुर त्यांच्या हटके अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवतो. अंकुर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या दैनंदिन अपडेट्स देत असतो. प्रेक्षकांना हसवणाऱ्या अंकुरने बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Ankur Wadhave News
Adah Sharma Marathi Poem: अदाने अस्खलीत मराठीत सांगितली इडलीची गोष्ट; व्हिडिओ होतोय व्हायरल

काल अंकुरच्या बायकोचा वाढदिवस होता. अंकुरने बायकोसाठी खास पोस्ट लिहिताना म्हटले की, 'प्रिय बायको, "व्यस्तातला व्यस्त ' वेळ ' तुझ्यासाठी, झोपेची अर्धी झोप तुझ्यासाठी, ओलांडली सीमा प्रेमाची तुझ्यासाठी, माझा कण नी कण तुझ्यासाठी, माझं मीपण तुझ्यासाठी, आयुष्य काय आहे? त्यापेक्षा जे महत्वाचं ते तुझ्यासाठी'.

'मी सतत कामात काम हेच परम ध्येय या वृत्तीचा आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून ते महत्वाच्या अनेक प्रसंगी तुला सोडून कामाला महत्व दिले आहे. त्याला तू तेवढंच समजून घेतलं. काल तुझा वाढदिवस. माझं वेळापत्रक रद्द झाल्याचा आनंद फक्त मला माहीत आहे. म्हणूनच तुला सरप्राइज देण्यासाठी कोणाला काहीही न सांगता घरी आलो, असं अंकुर म्हणाला.

'तुला कुठेही फिरवू शकलो नाही, पण काल आपण संपूर्ण रात्र बाहेर पुसदमध्ये मध्यरात्र घालवली. (तुला आवडलं की नाही माहीत नाही, पण मी या कॉलेजमध्ये शिकलो! मी येथे चालत स्टेनोच्या क्लासला जायचो म्हणून) तुला फार ज्ञान दिलं, तुला फार कंटाळा आला ना... 😜 असो तुला हॅप्पी बर्थडे डार्लींग', असं सांगत अंकूरने बायकोला दिलेलं रोमँटिक सरप्राइज चाहत्यांसोबत शेअर केलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com