Adipurush Box Office Advance Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Advance Collection: 'आदिपुरुष'ने रिलीजआधीच एकट्या हिंदी भाषेत केली रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा पाहून व्हाल थक्क

Adipurush Box Office Advance Collection: 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित चित्रपट असून 'आदिपुरुष'ची सध्या बॉक्स ऑफिसवर ॲडव्हान्स बुकींग सुरू आहे. यातच चित्रपटाने प्रदर्शनापुर्वी कोट्यावधींची कमाई केली आहे.

Chetan Bodke

Adipurush Box Office Advance Booking: 'आदिपुरुष' हा बहुचर्चित चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित चित्रपट असून 'आदिपुरुष'ची सध्या बॉक्स ऑफिसवर ॲडव्हान्स बुकींग सुरू आहे. यातच चित्रपटाने प्रदर्शनापुर्वी कोट्यावधींची कमाई केली आहे. 'आदिपुरुष' चित्रपट अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. त्यामुळे हा बहुचर्चित चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. ११ जूनपासून चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकींगही सुरू झाले आहे.

'आदिपुरुष' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा रामच्या भूमिकेत तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका, देवदत्त नागेने हनुमानाची तर नेहमीच ट्रोल होणाऱ्या सैफने रावणाची भूमिका साकारली आहे.'आदिपुरुष' चित्रपटाची ३६,००० तिकीटे विकली गेली आहेत. हा आकडा फक्त हिंदी वर्जनचाच आहे. फक्त हिंदी भाषेत आदिपुरुषने १.४० कोटींची कमाई केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपॉलिस यांची एकूण ३६००० तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाच्या तेलुगू, तमिळ व कन्नड या भाषेतील चित्रपटांची ॲडव्हान्स तिकीटांची बुकींग अद्याप सुरु ही झालेली नाही. तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमी दिवसांत कोट्यांवधीची कमाई केली आहे.

'आदिपुरुष' सिनेमा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला सज्ज झाला आहे. 'पठान', 'ब्रम्हास्त्र', 'आरआरआर' नंतर 'आदिपुरुष' हा चांगलीच कमाई करणार असल्याचं दिसत आहे. 'आदिपुरुष' चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा पल्ला गाठणार हे पाहणं औत्सु्क्याचे ठरणार आहे.

'द कश्मीर फाईल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी १०००० तिकीटे विकत घेऊन अनाथ मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याचपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर, गायक अनन्या बिर्ला आणि 'आरआरआर' फेम राम चरणनेही प्रत्येकी १०००० तिकीटे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच म्हणणं आहे की, जिथे रामाचं वास्तव्य असते तिथे हनुमानाचे वास्तव असते. यासाठी त्यांनी प्रत्येक थिएटरमधील १ सीट हनुमानासाठी रिकामी ठेवण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Potato Recipe : बटाट्याला द्या चटपटीत ट्विस्ट, फक्त १० मिनिटांत बनवा 'ही' प्रसिद्ध चाट रेसिपी

SCROLL FOR NEXT