South Famous Actor Death: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या अचानक एक्झिटने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अशातच आणखी एका सेलिब्रिटीचे निधन झाले आहे. नुकतंच 'असुरन' चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आणि आता मल्याळम अभिनेते कजान खान यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते कजान खान यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
प्रॉडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्यूसर एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खान यांच्या निधनाची माहिती दिली. एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खानचा फोटो शेअर करत माहिती दिली. (Tollywood)
कजान खानने १९९२ मध्ये सेंथामिझ पटू या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर त्याने 'सेतुपती आयपीएस', 'कलाईगनन', 'मुराई मामन' आणि 'करुप्पा नीला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. कजान खानने तमिळ आणि मल्याळम भाषेतील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याची खलनायक आणि नकारात्मक पात्रांसाठी चित्रपटसृष्टीत ओळख होती. (Bollywood Film)
कजान खान जेव्हा चित्रपटात दिसायचा तेव्हा खलनायकाच्या भूमिकेतील त्याचा भयानक अवतार आणि भाव पाहून प्रेक्षक घाबरायचे. कजान खानच्या खलनायकाच्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्याच्या खास अभिनयासाठी तो खूप लोकप्रिय आहे. (Entertainment News)
कजान खानने १९९५ मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मामूट्टीच्या द किंगमध्ये विक्रम घोरपडेच्या भूमिकेमुळे कजान खान मल्याळम सिनेमात हिट ठरला. कजान खानचा शेवटचा चित्रपट २०१५ मध्ये आला होता, त्याचे नाव 'लैला ओ लैला' होते. तेव्हापासून तो चित्रपट जगतापासून दूर होता. कजान खानने आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत अभिनयातून कधीच ब्रेक घेतला नसल्याचे म्हटले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.