Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी काय बनवावे? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. सकाळचा नाश्ता पौष्टिक असल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.
सकाळी तुम्ही नाश्त्याला कोबीचे खुसखुशीत थालीपीठ बनवू शकता. कोबीचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी सोपी आहे.
कोबीचे थालीपीठ बनवण्यासाठी कोबी, ज्वारीचे पीठ, बेसन, गव्हाचे पीठ, कांदा, हिरवी मिरची, आलं - लसूण पेस्ट, ओवा, पांढरे तीळ, हळद, कोथिंबीर, तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका परातीमध्ये कोबी बारीक किसून घ्या त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आलं-मिरचीची पेस्ट घालून नीट मिक्स करा.
आता त्यात ज्वारीचे पीठ, बेसन, गव्हाचे पीठ आणि मसाला हळद, मीठ, ओवा, तीळ टाका.
कोबीला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे आधी पाणी न घालता पीठ मळा. गरज वाटल्यास अगदी थोडं पाणी घालून मध्यम मऊ गोळा तयार करा.
एका सुती ओल्या कपड्यावर किंवा प्लास्टिक पेपरवर थोडं तेल लावा. पिठाचा छोटा गोळा घेऊन हाताने पातळ थालीपीठ थापा. वरून थोडे तीळ लावा आणि मध्यभागी छोटे छिद्र करा
गरम तव्यावर थोडे तेल सोडून थालीपीठ अलगद टाका. दोन्ही बाजूंनी खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर झाकण ठेवून भाजून घ्या.