धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

Adinath Shastri Maharaj news : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली.
Adinath Shastri Maharaj news
Adinath Shastri Maharaj news
Published On

सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी

Tarkeshwar Gad incident, Ahilyanagar religious leader news : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नये, मी लवकरच गडावर येईल असा मेसेज आदिनाथ शास्त्री महाराज यांनी आपल्या भक्तांना दिलाय.

गडावरील या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाराजांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.आदिनाथ शास्त्री जखमी असल्याचे समजताच भक्तांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तारकेश्वर गडाच्या महाराजांनी का उचलले टोकाचे पाऊल? असा सवाल नगर आणि आजूबाजूच्या परिसरात विचारला जातोय. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. आदिनाथ महाराज यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजतेय.

Adinath Shastri Maharaj news
रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाचा थंड डोक्यानं केला खून, मृतदेह जंगलात पुरला; ४० दिवसांनंतर झाला भंडाफोड, संभाजीनगर हादरले

जखमी आदिनाथ शास्त्री महाराज यांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मी लवकरच गडावर येईल असा संदेश महाराजांनी आपल्या भक्तांना दिला आहे. आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती.

Adinath Shastri Maharaj news
Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत आता सुधारत आहे. आदिनाथ शास्त्री महाराज यांचा राज्यासह बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा भक्तवर्ग असल्याने अनेक अफवांचे पेव फुटले आहे. तर अनेक भक्तांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र आदिनाथ शास्त्री महाराज यांची प्रकृती आता ठीक असून डॉक्टरांनी त्यांना आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.

Adinath Shastri Maharaj news
इराणच्या हल्ल्यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू? त्या व्हिडिओनंतर जगभरात खळबळ; नेमकं काय आहे सत्य?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com