Alia-Ranbir SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia-Ranbir : कपूर कुटुंबात लवकरच पाळणा हलणार, आलिया-रणबीर दुसऱ्या बाळाचं करतायत प्लॅनिंग?

Alia-Ranbir Planning Their Second Child : बॉलिवूडचे पावर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. ही दोघे आपल्या दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अलिकडेच रणबीरने आलियाचा प्री बर्थडे खूप धुमधड्यात साजरा केला. यांची लेक राहा कामय तिच्या क्यूट लूकमुळे चर्चेत असते. मात्र सध्या राहाला कॅमेरापासून दूर ठेवण्यात आले आहे. अशात आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे.

रणबीर आणि आलिया आपल्या दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नुकत्याच झालेल्या एका मीडिया मुलाखतीत रणबीर कपूरने याबाबत एक हिंट दिली आहे. मिडिया मुलाखतीत रणबीरला रणबीरने त्याच्याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली. यात एक प्रश्न असा होता की, तू नवीन टॅटू काढणार आहे का? यावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणबीर कपूर उत्तर देत म्हणाला, "अजून तरी मला माहित नाही, भविष्यात आशा आहे. कदाचित माझ्या मुलांच्या नावांचा टॅटू काढेन." उत्तरात रणबीरने उल्लेख केला 'मुलांचा' यावरून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चाहते मात्र या बातमीने खूप खुश झाले आहेत.

दुसरीकडे एका मीडिया मुलाखतीत आलिया भट्टने आम्ही आधीच एका मुलाचे नाव ठरवले असल्याचा खुलासा केला आहे. आलिया राहाच्या नावा मागची गोष्ट सांगताना म्हणाली की, "मी आणि रणबीर अशी नावं शोधत होतो की, जी मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही चांगली असतील. राहा हे नाव दोघांनाही चांगलं दिसेल मुलगा असो वा मुलगी. मी आणि रणबीरने मुलगा आणि मुलगी दोघांचीही नावे आधीच ठरवली आहेत. "

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022मध्ये लग्नबंधनात अडकले होते. यांनी खूप साध्या पद्धतीने घरीत लग्नसोहळा पार पाडला होता. त्यानंतर त्यांना लेक राहा झाली आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाची बहार आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : इंजिनियरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, भिवंडीत भयंकर अपघात, आई-वडिलांचा आक्रोश

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

दिवाळीआधी लाडकीला सरकारचे आणखी एक गिफ्ट, e-KYC च्या मुदतवाढीवर मोठी घोषणा, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

Bank Fraud : बँकेत महाघोटाळा, तब्बल 195 बोगस कर्ज खाती; माजी अध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा, VIDEO

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

SCROLL FOR NEXT