HBD Mrunal Thakur Saam Tv
मनोरंजन बातम्या

HBD Mrunal Thakur: हिंदी मालिका ते साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री; एकेकाळी आयुष्य संपवायला निघालेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे आज कोट्यवधींची मालकीण

Mrunal Thakur Career: मृणाल ठाकूर ही बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मृणालने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मृणालला चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना खूप संघर्ष करावा लागला होता.

Siddhi Hande

मृणाल ठाकूर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मृणाल आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. मृणालने खूप कमी वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. मृणालने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली आहे. मृणाल ही मूळची महाराष्ट्राची आहे. तिचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी धुळ्यात झाला.

मृणाल ठाकूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा सिता रामम हा चित्रपट सर्वात जास्त हिट ठरला. मृणालने आज कठोर परिश्रम आणि मेहनतीमुळे लाखे चाहत्यांची मने जिंकली आहे. मृणाल आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

मृणालने हिंदी मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले. मृणालने 'कुमकुम भाग्य' या मालिकेत बुलबुल ही भूमिका साकारली होती. या मालिकेतूनच तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

मृणालला बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना खूप संघर्ष करायला लागला होता. तिला अनेक नकार मिळाले होते. यादरम्यान ती खूप खचली होती. तिच्या मनात तर आत्महत्येचा विचारदेखील आला होता. मात्र,मृणालला 'लव्ह सोनिया' या चित्रपटातून ब्रेक मिळाल. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. मृणालने नेहमीच हटके आणि आव्हानात्मक भूमिका निवडल्या आणि त्या उत्तम रितीने पार पाडल्या. त्यामुळे तिचे खूप कौतुक केले जाते. मृणालने त्यानंतर हृतिक रोशनसोबत 'सुपर ३'० चित्रपटात काम केले. या चित्रपटात तिची आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती.मृणाल ने 'बाटला हाऊस' या चित्रपटातही उत्तम काम केले होते.

मृणालची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री

मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये तर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, सीता रामम या चित्रपटाने तिची लोकप्रियता अजूनच वाढली. दुल्कर सलमान, रश्मिका मंदानासोबत तिने स्क्रिन शेअर केली. या चित्रपटातील मृणाल आणि दुल्कर सलमानची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

मृणाल ठाकूर ही कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. मिडिया रिपोर्टनुसार, मृणाल चित्रपटासाठी २ कोटींचे मानधन घेते. तिचे महिन्याला ६० लाख रुपये कमावते. मृणाल ठाकूरची वार्षिक कमाई ७ कोटी रुपये आहे. मृणालकडे अनेक महागड्या कार आहेत. तिची एकूण संपत्ती ३३ कोटी रुपये आहे, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT