Bollywood Actresses Who Married Cricketers Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress And Cricketer Wedding : अफेरची चर्च ते लग्नगाठ: कोणते क्रिकेटपटू अडकले बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नबंधनात

Bollywood Actresses Who Married Cricketers : भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत असतात. अनेक भारतीय क्रिकेटपटूंचं अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mayur Gawande- Saam TV

भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत असतात. अनेक भारतीय क्रिकेटपटूंचं अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेलं आहे. युवराज सिंह आणि दीपिका पादुकोण, महेंद्र सिंह धोनी आणि दीपिका पादुकोण यांच्या देखील नात्यांबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती. मात्र दीपिकाने रणवीर सिंहसोबत लग्न केले. चर्चेत राहिलेले अफेअर हे चर्चेतच राहिले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची एका जाहिरातीदरम्यान भेट झाली होती. त्यानंतर दोघे चर्चेत आले होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानतंर दोघांनी इटलीत ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 'विरुष्का' चर्चेत आले होत. अनुष्काने 'रब ने बना दी जोडी', 'पीके', 'ए दिल है मुश्किल', 'सुई धागा', 'सुलतान', 'दिल धडकने दो' यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने २०२० मध्ये नताशा स्टॅन्कोविक हिच्याशी लग्न केलं. हार्दिकने दुबईत एका बोटीवर नताशाला प्रपोझ केले होते. नताशा सर्बियाची असून ती एक अभिनेत्री आहे. तिने 'सत्याग्रह' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'ॲक्शन जॅक्सन', 'फुकरे रिटर्न्स' आणि 'द बॉडी' यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक- नताशा वेगळे झाल्याची चर्चा सुरू आहे.

के एल राहुल आणि अथिया शेट्टी

क्रिकेटपटू के एल राहुल आणि आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केल्यानंतर लग्न केलंय. अथिया शेट्टी ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. २०२३ मध्ये दोघांनी लग्न केलंय. अथियाने आतपार्यंत फक्त ४ चित्रपट केले आहेत. तीने 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'मुबारकां', 'नवाबजादे', 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

झहीर खान आणि सागरिका घाटगे

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत २०१७ मध्ये लग्न केले. सागरिकाने 'चक दे इंडिया', 'इरादा', 'प्रेमाची गोष्ट', 'स्माईल प्लिज' या चित्रपटांमध्ये काम केले आहे... मात्र सागरिका लग्नानंतर अभिनयापासून दूर गेली आहे. त्याआधी झहीर खान आणि अभिनेत्री ईशा शरवानी हे एकमेकांना ८ वर्ष डेट करत होते. मात्र काही दिवसांनंतर दोघे वेगळे झाले.

युवराज सिंह आणि हेजल

भारताचा ऑलराउंडर युवराज सिंगने अभिनेत्री हेजल कीच सोबत ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लग्नगाठ बांधली. हेजल ब्रिटिश अभिनेत्री आहे. तिने सलमानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटात करीना कपूरच्या मैत्रीणीची भूमिका साकारली आहे. तसंच हेजलने तमिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे...

हरभजन सिंग आणि गीता बसरा

भारतीय स्पिनर बॉलर हरभजन सिंग याने गीता बसरा सोबत लग्न केलंय. गीता बसराचा जन्म इंग्लंडमध्ये झालाय. ती पेशाने ब्रिटीश अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मीच्या 'दिल दिया है', 'द ट्रेन' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २९ ऑक्टोबर २०१५ रोजी जालंधरजवळील गुरुद्वारामध्ये एका समारंभात त्यांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT