IAF Sukhoi Su-30MKI : मोठी बातमी! उड्डाण घेताच सुखोई विमान कोसळले, मराठी फायटर पायलटचं निधन

IAF Sukhoi Su-30MKI aircraft details : आसाममध्ये सराव उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई-30MKI लढाऊ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर यांचा मृत्यू झाला.

IAF Sukhoi Su-30MKI Crash in Assam, Two Pilots Killed After Fighter Jet Goes Down : आसाममध्ये नियमित सरावावेळी हवाई दलाचे सुखोई-३० एमकेआय (IAF Sukhoi Su-30MKI) लढाऊ विमानाचा भयंकर अपघात झाल. उड्डाण घेतल्यानंतर ६० किमी अंतरावर विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरूवारी रात्री IAF Sukhoi Su-30MKI विमानाचा अपघात झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर यांचे निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने दोघांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मराठमोळे पायलट पूर्वेश दुरागकर यांचे अपघातात निधन झाले आहे.

गुरुवारी संध्याकाळी जोरहाट एअरबेसवरून Sukhoi Su-30MKI ने उड्डाण घेतलं. पण काही वेळातच विमान रडारवरून बेपत्ता झाले. त्यानंतर आसममधील डोंगर अन् घनदाट जंगलात कोसळले, असे विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com