Tanushree Dutta SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tanushree Dutta : "उशीर होण्याआधी मदत करा, घरातच छळ होतोय"; तनुश्री दत्ताने रडत रडत केली विनंती | VIDEO

Tanushree Dutta Crying Video : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती ढसाढसा रडत मदत मागताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा एका गंभीर कारणामुळे तनुश्री चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे, जाणून घेऊयात.

तनुश्रीने व्हिडीओ शेअर करून तिला घरात होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वांना सांगितले आहेत. तनुश्री व्हिडीओमध्ये खूप रडताना दिसत आहे. तिने या व्हिडीओला कॅप्शन लिहिलं आहे की, "मी या छळाला कंटाळली आहे... 2018 पासून हे सुरू आहे #metooआज शेवटी कंटाळून मी पोलीसांना फोन केला...कृपया कोणीतरी मला मदत करा! खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा..." तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये काळजी व्यक्त केली आहे.

तनुश्री व्हिडीओत म्हणाली की, "मला माझ्या घरातच त्रास दिला जात आहे. शेवटी कंटाळून मी पोलीसांना कॉल केला. त्यांनी मला तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. माझी तब्येत सध्या ठीक नाही आहे. त्यामुळे मी उद्या किंवा परवा पोलीस स्टेशनला जाणार आहे. गेल्या 4-5 वर्षात मला एवढा त्रास दिला जात आहे की माझी तब्येत खराब झाली आहे. माझं संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालं आहे. मी घरात काम करायला नोकर देखील ठेवला नाही आहे. कारण त्यांनी घरात चोरीचा प्रयत्न केला. मला मदतीची खूप गरज आहे. कोणी तरी प्लीज मला मदत करा..."

यानंतर तनुश्रीने आणखी एक व्हिडीओ शेअर करून त्याला एक कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये तनुश्रीच्या घराबाहेर विचित्र आवाज ऐकू येत आहे. तसेच व्हिडीओत तनुश्री म्हणते की, "पोस्ट कर दू" तनुश्रीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आल्यासोबत काय घडत आहे. याचा खुलासा केला आहे. तिने लिहिलं की, "2020 पासून मी माझ्या छतावर आणि दाराबाहेर जवळजवळ दररोज अशाच प्रकारच्या मोठ्या आवाजांचा सामना केला आहे. मी इमारत व्यवस्थापनाकडे तक्रार करून काही वर्षांपूर्वी हार मानली.आता मी या आवाजासोबत राहते. माझे मन विचलित करण्यासाठी आणि माझे आरोग्य चांगले राखण्यासाठी हिंदू मंत्रांसह हेडफोन लावतो."

"आज मी खूप आजारी आहे. कारण गेल्या 5 वर्षांपासून सतत ताणतणाव आणि चिंतेचा सामना केल्यामुळे मला क्रॉनिक थकवा सिंड्रोम झाला आहे. कल्पना करा. काल मी पोस्ट केले आणि आज हे! अब समझ जाओ सब लोग की मी काय सहन करत आहे और भी बोहत कुछ है जो एफआयआर में उल्लेख करूंगी..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गेल्या २० तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT