Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, स्वाइन फ्लूची लागण

Bollywood Actress Diagnosed With Swine Flu : बॉलिवूड अभिनेत्रीला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. अभिनेत्रीचे हेल्थ अपडेट जाणन घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या अभिनेत्रीची प्रकृती बिघडली

डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला

अभिनेत्रीला स्वाइन फ्लूची लागण

बॉलिवूड अभिनेत्री आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शबाना आजमी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या CJP च्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विद्यार्थींना खंबीर पाठिंबा दिला.

शबाना आजमी यांची इन्स्टाग्राम पोस्ट

"माझ्या प्रिय मुंबईकरांनो, मला काल तुमच्या आंदोलनात सहभागी व्हायचे होते, पण मी H1N1 घेऊन आले आहे आणि मला पुढील पाच दिवस वेगळे राहावे लागेल. तरीही, मला माझी एकता आणि कौतुक व्यक्त करायचे आहे. मला ग्राउंडवरील तरुण लोकांकडून प्रथम हाताने अहवाल मिळत आहेत, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रथमच निषेधात भाग घेतला आहे आणि त्यांचा आवाज किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी अनुभवले आहे. मी तुमच्या धैर्याने आणि वचनबद्धतेने प्रेरित होत आहे आणि एकजुटीने तुमच्या पाठीशी उभी आहे..."

तसेच शबाना आजमी यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, 'अभिनेत्रीला स्वाइन फ्लू झाला असून त्यांना १०२ अंश इतका तीव्र ताप आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे...'काही दिवसांपूर्वी शबाना आजमी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. त्या आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या आंदोलनाची सर्व माहिती दिली. या अभिनेत्रीने आंदोलनाच्या ठिकाणचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

काल (२५ जुलै) ला कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपार्टमेंटच्या जिन्यात अडगळीच्या वस्तू ठेवल्यातर फ्लॅटधारकांना दंड आकारला जातो?

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Rain Alert : दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज काय

Limbu Pani Benefits : किडनी स्टोन सारख्या आजारांवर बेस्ट उपाय, लिंबू पाणी पिण्याचे 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Saturday Horoscope : जन्माष्टमीला या 5 राशींचे नशीब चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने होणार धनलाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT