Rain Alert : दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज काय

Maharashtra Weather Update News : दहीहंडीच्या उत्सवाला पावसाची साथ मिळण्याची शक्यता. धुळे, नाशिक आणि नांदेडमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update News
Maharashtra Weather Update News AI Image
Published On
Summary
  • दहीहंडीच्या उत्सवाला आज पावसाची साथ

  • धुळे, नाशिक आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

  • महाराष्ट्रातील इतर भागांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस

  • येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Update Today News राज्याभर आज दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान दहीहंडीच्या या उत्सवाला वरुण राजा साथ देणार आहे. महाराष्ट्रात रात्रीपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळत असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यातील इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक, तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात.

Maharashtra Weather Update News
Fatty Liver : तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, भूक लागत नाही? फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणे दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून ऊन आणि सावलीचा खेळ सुरू राहू शकतो. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली, तरी सर्वदूर पाऊस होण्याची चिन्हे सध्या कमी आहेत. हवामानातील या बदलामागे मध्य प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

Maharashtra Weather Update News
Limbu Pani Benefits : किडनी स्टोन सारख्या आजारांवर बेस्ट उपाय, लिंबू पाणी पिण्याचे 'हे' ६ फायदे जाणून घ्या

या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही हवामान प्रणाली सध्या आहे त्याच भागात स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दहीहंडी उत्सवाला पावसाची साथ मिळणार आहे. त्यामुळे गोंविदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com