Aamir Khan : दिग्दर्शकासोबत झोप अन् पैसे आण, आमिर खानच्या भावावर अभिनेत्रीचे थरकाप उडवणारे आरोप

Aamir Khan Brother Forced Ex Wife To Sleep With Directors For Money : आमिर खानच्या भावाबद्दल धक्कादायक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे. ती आमिर खानच्या भावाची बायको होती.
Aamir Khan Brother Forced Ex Wife To Sleep With Directors For Money
Aamir Khansaam tv
Published On
Summary

आमिर खानच्या भावावर गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेत्रीने आमिर खानच्या भावाबद्दल केला मोठा खुलासा

पैशांसाठी अभिनेत्रीला दिली अश्लील काम करण्याची ऑफर

टिव्ही इंडस्ट्रीत आज अनेक मोठ्या अभिनेत्री झाल्या आहेत. ज्यांनी इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात अनेक वाईट अनुभवांना तोंड दिले आहे. 'शरारत' मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इवा ग्रोव्हरने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खडतर काळाबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री इवा ग्रोव्हरने तिचा एक्स पती हैदर अली खानवर गंभीर आरोप केले आहेत. हैदर अली खान हा आमिर खानचा सावत्र भाऊ आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

सिद्धार्थ कन्ननसोबतच्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की, आर्थिक स्थिरतेच्या बदल्यात दिग्दर्शकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर एक्स पतीने दबाव आणला होता. संभाषणादरम्यान इवा ग्रोव्हरला विचारण्यात आले की हैदरने तिला इतरांसोबत शारीरिकदृष्ट्या जवळीक होण्यासाठी कधी प्रोत्साहन दिले आहे का? या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली की, "उन्होंने ऐसी बात रखी थी, बहुत दबाव डाला था मुझपे..."

तिला पुढे विचारण्यात आले की त्याने तिला काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत झोपायला लावले आहे का? इवाने स्पष्ट केले की तिच्याकडे अभिनयाच्या संधींची कधीही कमतरता नव्हती आणि खरं तर, कठीण काळात कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण वैयक्तिक त्याग तिने केले. अभिनेत्री म्हणाली, "माझ्याकडे नेहमीच काम होते. पण ज्या काळात मी नोकरी सोडली, त्या काळात मी माझ्या सगळ्या FDs मोडल्या, कुटुंबासाठी माझ्या गाड्या विकल्या, मी सर्व काही केले. मी त्यांना दुसऱ्यांना सांभाळले होते, तेव्हा त्याच्याकडून अशी ऑफर आली होती.

त्या घटनेची आठवण करून ती पुढे म्हणाली, "काय फरक पडतो? कारण मला ऑफर्स यायच्या, अभिनेत्रींना येतात. मोठ्या ऑफर्स येतात. माझा स्वतःचा एक्स पती म्हणाला होता, 'काय फरक पडतो, कर... तुला करावे लागेल. तुला घर चालवायचे आहे.आपलं विजेचे बिल खूप आले आहे...आपल्या मुलासाठी पैसे हवे आहेत...' तिथेच हे सर्व संपले. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही..."

इवाने हेही उघड केले की हैदरला स्किझोफ्रेनिया आहे. तिने सांगितले की, जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा तिला त्याच्या आजाराबद्दल माहिती नव्हती, कारण ते एकमेकांना फारसे ओळखत नव्हते. त्या अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, हे नाते लवकरच हिंसक बनले आणि तिच्या शरीरावर अनेकदा जखमांच्या खुणा दिसू लागल्याने तिच्या कुटुंबीयांना खूप काळजी वाटू लागली.

Aamir Khan Brother Forced Ex Wife To Sleep With Directors For Money
Suraj Chavan : माझा राया गं...; सूरज चव्हाणला बायकोनं दिलं खास सरप्राइज, रोमँटिक डान्सचा VIDEO चर्चेत

इवा ग्रोव्हर एक्स पतीविषयी चिंता व्यक्त करत म्हणाली की, "आज हैदरची अवस्था चांगली नाही. त्याच्याकडे स्वतःचे घर नाही आणि अन्नासाठीही त्याला संघर्ष करावा लागतो. कधी एखादी व्यक्ती त्याला चाळीत राहू देते, तर कधी एखादा मित्र त्याला मदत करतो. मला वाईट वाटते. जे काही घडले ते घडले, पण माणुसकीच्या दृष्टीने विचार करता, तो एकेकाळी माझा पती होता... तो अशा लोकांच्या सहवासात आहे जे त्याला सतत दारू देतात. त्याची काळजी घेणारे कोणीही नाही..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com