Shreya Maskar
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
जेनिफर विंगेट सुंदर व्हाइट गाउन मध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ती पतीला lip lock करताना दिसत आहे.
जेनिफर विंगेटने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी प्रेमाचा वर्षाव करत आहे. दोघांना आपल्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
जेनिफर विंगेटने विल्यम इश्माएलसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. विल्यम इश्माएल प्रसिद्धीच्या झोतापासून दूर सिंगापूरचा राहणारा फायनान्स प्रोफेशनल आहे.
TOI च्या वृत्तानुसार, विल्यम इश्माएल सध्या 'एमएचसी डिजिटल ग्रुप' (MHC Digital Group) मध्ये 'डायरेक्टर ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट अँड ट्रेडिंग' म्हणून कार्यरत आहेत.
विल्यम इश्माएल यांनी 'यूबीएस इन्व्हेस्टमेंट बँक' मध्ये काम केले आहे. त्यांनी इंग्लंडमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क'मध्ये अर्थशास्त्र आणि वित्त विषयांचे शिक्षण घेतले.
जेनिफर विंगेटने अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 'दिल मिल गये', 'सरस्वतीचंद्र', 'बेहद', 'बेपनाह' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.
जेनिफर विंगेटचे पहिले लग्न अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत एप्रिल 2012 रोजी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.