Gautami Patil : "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा..."; गौतमी पाटीलचा नखरा पाहून नेटकरी घायाळ, 'ते' Photos आले समोर

Shreya Maskar

गौतमी पाटील

नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून 'हिल पोरी हिला...' या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. गौतमीच्या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

Gautami Patil | instagram

हिल पोरी हिला...

'हिल पोरी हिला...' या गाण्यातून पहिल्यांदाच गौतमी पाटील आणि कॉमेडी किंग भाऊ कदम यांची जोडी एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hill Pori Hila... | instagram

गाणे कधी रिलीज झाले?

'हिल पोरी हिला...' हे गाणे ५ जूनला रिलीज झाले आहे. हे गाणे गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी आपल्या सुरेल आवाजात संगीतबद्ध केले आहे.

song | instagram

शूटिंगचे फोटोज

गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांच्या गाण्याचे शूटिंग दरम्यानचे फोटो समोर आले आहे. गौतमीने फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photos from the shooting | instagram

गौतमीचा लूक

फोटोंमध्ये गौतमीने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. कपाळावर लाल रंगाचा टिळा, केसात गजरा आणि गोल्डन ज्वेलरीने गौतमीने हा लूक पूर्ण केला आहे. पारंपरिक लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.

Gautami's look | instagram

गौतमीचे सौंदर्य

फोटोंमध्ये गाण्याची शूटिंग करताना गौतमी पाटीलची मजा-मस्ती पाहायला मिळत आहे. तसेच तिचे सौंदर्य लाजवाब आहे. चाहते भरभरून फोटोंवर कमेंट्स करत आहेत.

Gautami's beauty | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

एका युजरने फोटोंवर कमेंट केली की, "हिल हिल पोरी हिला तुझ्या प्रेमात झालो फिदा...", दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "तू खूपचं सुंदर दिसते, तुझी स्माइल खूपच गोड आहे..."

Comments from fans | instagram

करिअर

गौतमी पाटील आजवर अनेक गाण्यांमध्ये झळकली आहे. तसेच ती मराठी मालिकांमध्येही दिसली आहे. साधा-भोळा स्वभाव, सुंदर नृत्य कौशल्य आणि सौंदर्यामुळे गौतमी पाटीलने प्रेक्षकांना आपल केले आहे.

Career | instagram

NEXT : इतकं सुंदर हास्य, कॅमेऱ्यातही सहज टिपलं; गौतमीचे फोटो पाहून चाहते अवाक

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...