Dhanshri Shintre
मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून रक्त स्वच्छ करतो, ज्यामुळे शरीराच्या स्वास्थ्यासाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे.
किडनी स्टोनपासून मुक्तता आणि चांगले कार्य सुनिश्चित करण्यासाठी सकाळी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी द्रवपदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे ताजेतवानेपणा वाढतो.
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने मूत्रपिंड उत्तम प्रकारे कार्य करतात. योग, जॉगिंग, धावणे आणि चालणे हे फायदेशीर ठरतात.
चहा किंवा कॉफीऐवजी सकाळी हर्बल टी पिल्याने मूत्रपिंडाचे कार्य सुधारते, कॅफिनमुळे होणारे डिहायड्रेशन टळते.
जास्त मीठ सेवन मूत्रपिंडांसाठी हानिकारक आहे. सकाळी जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात द्रवपदार्थांचा साठा होतो.
फळे आणि भाज्या खाल्ल्याने मूत्रपिंडांचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.