अपार्टमेंटच्या जिन्यात अडगळीच्या वस्तू ठेवल्यातर फ्लॅटधारकांना दंड आकारला जातो?

Housing Society Rules : सोसायटीच्या जिन्यात किंवा सामायिक जागेत वस्तू ठेवल्यास दंड आकारता येतो का? सायकल पार्किंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ₹15.45 लाखांचा दंड रद्द करताना सोसायटीच्या अधिकारांबाबत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.
Housing Society Rules :
Housing society common area encroachment rules Maharashtrasaam tv
Published On
Summary
  • उच्च न्यायालयाने जिन्यात सायकल पार्क केल्याप्रकरणी आकारण्यात आलेला ₹15.45 लाखांचा दंड रद्द केला.

  • सोसायटीने कारवाई करताना वैध उपविधी, वेळेवर नोटीस आणि प्रमाणबद्ध दंड यांचा विचार करणे आवश्यक

  • सोसायटीने जवळपास ११ वर्षे आक्षेप नोंदवला नाही आणि नंतर मागील कालावधीसाठी मोठा दंड आकारला, यावर न्यायालयाचा आक्षेप

मुंबईत आलिशान अपार्टमेंट विकत घेणे म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही. इतकेच नाही तर इमारतीच्या जिना किंवा इतर ठिकाणी अडगळीचे वस्तू ठेवण्यास प्रतिबंध असतो.बहुतेकदा सोसायटीकडून दंड आकारला जातो. अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की, खरंच सोसायटी फ्लॅटधारकांकडून दंड घेऊ शकतात का? हा नियम समजून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील खटला जाणून घेऊन.

Housing Society Rules :
अपार्टमेंटमध्ये घर घेताय? कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणं असतं शुभ? घर खरेदीवेळी चार गोष्टी ठेवा डोक्यात

मुंबईतील धनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील एक प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. मात्र निर्णय देताना कोर्टानं महत्त्वाचे निर्दशनं नमूद केली आहेत. धनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने सभासद योगिनी व सेजल यांच्याविरोधात दंड आकरण्यात आला होता.

Housing Society Rules :
भाड्याच्या घरातील दुरुस्ती अन् रंगकामाचा खर्च कोण करणार, भाडेकरू की घरमालक?

इमारतीच्या दोन मजल्यांमधील जिन्यावरील मोकळ्या जागेत सायकल पार्किंग केल्यानं ११ वर्षांच्या कालावधीसाठी सोसायटीतील एका सदनिकेच्या दोन सभासदांना तब्बल १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांचा दंड आकरण्यात आला होता. विशेष म्हणजे सोसायटीचा हा निर्णय सहकार उपनिबंधकांनीही कायम ठेवला. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सोसायटी व उपनिबंधकांवर ताशेरे ओढले आणि दंडाचा आदेश रद्द करत सभासदना दिलासा दिला.

‘हाऊसिंग सोसायटीतील सदस्यांनी सोसायटीच्या सामायिक जागांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्याच्या प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा न्यायालयाचा हेतू नसल्याचंही न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटलं होतं. मात्र, सोसायट्यांनीही कारवाई करताना काही प्रमाणात विवेकबुद्धी व वाजवीपणा बाळगणे आवश्यक असल्याच न्यायालयानं म्हटलंय.

सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने सभासदांवर अवाजवी मागण्या लादून एखाद्या सर्वोच्च नियामक प्राधिकरणाची भूमिका घेता कामा नये. सायकल उभी करण्यासारख्या किरकोळ प्रकारासाठी तब्बल ११ वर्षांचा मागील कालावधी गृहीत धरून दंड आकारण्यासाठी आदर्श उपविधी १६९(अ)चा गैरवापर करता येणार नसल्याचं म्हणत न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी निर्णयात तीव्र नाराजी व्यक्त केली.

दंड कधी आकारता येतो?

फ्लॅटधारकांना दंड आकारण्याबाबत उच्च न्यायालयाने सांगितलं की, जेव्हा सायकल उभी केल्याचे निदर्शनास आले, तेव्हाच सोसायटीने आक्षेप घेऊन हटवण्याचे निर्देश देणे आवश्यक होते. शिवाय उपविधी क्रमांक १६९(अ) अन्वये अतिक्रमणाच्या कालावधीसाठी मागील कालावधीपासून दरमहा मासिक देखभाल शुल्काच्या पाचपट दंड आकारण्याची कठोर तरतूद असल्याची जाणीव सभासदांना व्हावी आणि त्यांना सुधारणेची संधी मिळावी, यादृष्टीने सोसायटीने तत्परतेने कृती करायला हवी होती. त्याऐवजी त्या नियमाचा गैरवापर करून पूर्वलक्ष्यी प्रभावाने मागील ११ वर्षांच्या कालावधीसाठी असा जबर दंड आकारणे चुकीचं असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com