Javed Akhtar: 'शबाना आणि मी रस्त्यावर झोपतो...'; पाकिस्तानी अभिनेत्रीच्या विधानावर जावेद अख्तर संतापले

Javed Akhtar On Pakistani Actress: एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी भारत सरकारला पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती.
Javed Akhtar On Pakistani Actress
Javed Akhtar On Pakistani ActressSaamTv
Published On

Javed Akhtar On Pakistani Actress: एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी भारत सरकारला पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी यांनी जावेदवर बरीच टीका केली होती. बुशरा अन्सारी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने जावेद अख्तर यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या आणि नसीरुद्दीन शाह आणि इतर कलाकारांप्रमाणे त्यांनी गप्प राहावे असे म्हटले होते. इतकेच नाही तर बुशरा यांनी नाव न घेता असेही म्हटले होते की त्यांना पत्नी शबाना आजमी यांना मुस्लिम असल्याने मुंबईत भाड्याने घरही मिळत नाही.

जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारीला दिलेले चोख उत्तर

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या या वादग्रस्त विधानावर जावेद अख्तर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शोलेचे पटकथालेखक म्हणाले, "पाकिस्तानी टीव्ही कलाकार बुशरा अन्सारी यांनी एकदा रागाने मला विचारले होते की मी गप्प का बसत नाही. तिने म्हटले होते की मी नसीरुद्दीन शाहांसारखे गप्प बसावे. पण ती मला हा सल्ला देणारी कोण आहे? मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात २५ समस्या असू शकतात, पण जेव्हा पाकिस्तानविरुद्ध बोलतो तेव्हा मी एक भारतीय आहे."

Javed Akhtar On Pakistani Actress
Karate Kid Legends Collection: अजय देवगणच्या लेकाचा पहिला चित्रपट हाऊसफुल; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची किती कमाई

शबाना आझमींना खरोखरच फ्लॅट मिळाला नाही

जावेद अख्तर यांनी बुशरा अन्सारीच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी उपहासात्मकपणे म्हटले होते की, "हो, शबाना आणि मी आजकाल फूटपाथवर राहतो. काय बोलयचं आता यांना. पहा, हे खरे आहे की शबाना सुमारे २५ वर्षांपूर्वी फ्लॅट खरेदी करू इच्छित होती, परंतु त्यांना मुस्लिम असल्याचे सांगून नकार दिला. त्यांनी असं केलं कारण त्यांच्या पालकांना या पाकिस्तानी लोकांनी सिंधमधून हाकलून लावले होते.

Javed Akhtar On Pakistani Actress
Kamal Haasan: कमल हासन यांच्या वक्तव्यावर कर्नाटक सरकार नाराज; अभिनेत्याच्या 'थग लाइफ' चित्रपटावर बंदीची घोषणा

बुशरा अन्सारी कोण आहे?

बुशरा अन्सारी ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ६९ वर्षीय बुशराने ७० च्या दशकातील टीव्ही शो 'फिफ्टी फिफ्टी' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने 'जवानी फिर नहीं आनी' आणि 'हो मन जहाँ' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com