Maharashtra News Live Update: येवला व नांदगावमधील मराठा समाज बांधवांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना

Marathi Breaking Live Headlines Updates : आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव, शिक्षक दिन, मनोज जरांगे यांचं उपोषण, ओबीसी मोर्चा, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

येवला व नांदगावमधील मराठा समाज बांधवांचा ताफा अंतरवाली सराटीकडे रवाना

गेल्या सात दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत येवला व नांदगाव येथून मराठा बांधव गाड्यांचा ताफा घेऊन अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे.

प्रमोद नाना भानगिरे एकनाथ शिंदे फाऊंडेशनतून २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

पुण्यातील हांडेवाडी भागात असलेल्या धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचे आयोजक प्रमोद नाना भानगिरे यांनी त्यांच्या एकनाथ शिंदे फाऊंडेशन मार्फत २ विद्यार्थ्यांचा पहिली ते दहावी पर्यंतचा सगळा खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. परंपरा पुढे जपत आजच्या या दहिहंडी उत्सवात पारंपारिक ढोल ताशा वादन करण्यात आलं तसचं पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करत साउंड सिस्टिम ची मर्यादा सुद्धा पाळली गेली.

मंत्री आदिती तटकरे यांनी लुटला पारंपारिक दहीहंडी उत्सवात नाचण्याचा आनंद 

रोहा येथील दहीहंडीत गोविंदांसोबत हातात गदा घेऊन आदिती तरकरे नाचल्या

० गोविंदा पथकात जल्लोशात नाचतानाचा मंत्री आदिती तटकरे यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांसोबत ठेका

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी डान्स करण्याचा आनंद घेतला. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडाळी येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. मुलांचा अभ्यास, त्यांची गुणवत्ता, विविध कौशल्ये आणि कलागुण यांचे कौतुक करताना जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अगदी मिसळून त्यांच्यासोबत नृत्यही केले! विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या आनंदात सहभागी होत आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी कृतीने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.

रायगडच्या मुरूडमध्ये माकडाने खाल्ल दहीहंडीतील दही

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरू असतानाच रायगडच्या मुरूडमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. मुरुड शहरात सुरू असलेल्या गोपाळकाला उत्सवात माकडाने दोरीवर बांधलेल्या दहीहंडीतील दही खाल्ल्याचं पहायला मिळालं. माकड हंडीतील दही खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ठाण्यात आतापर्यंत 12 गोविंदा किरकोळ जखमी

इलेक्ट्रिक शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात इलेक्ट्रिक शॉक लागून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. रोहित बाळू महाजन वय 30 वर्ष असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून, तो मूळचा जळगावचा आणि सध्या भोसरीत वास्तव्यास होता. भोसरी येथील व्यापारी संकुलातील डक मध्ये काम करत असताना रोहित बाळू महाजन याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

पुण्यातील धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाला सुरुवात

पुण्यातील हांडेवाडी येथील प्रमोद नाना भानगिरे यांच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात

ढोल ताशा पथकाकडून वादनाला सुरुवात

रात्री १० वाजता फोडली जाणार दहीहंडी

17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, अमरावतीत आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

दोन दिवसांपूर्वी आरोपी आनंद भड यांने अल्पवयीन तरुणीवर चाकूने वार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली.आता पोलीस या आरोपीला घटनास्थळी धीड काढून नेत आहे.

अभिनेता गोविंदाचा ‘युथ शक्ती दहीहंडी’त सहभाग; म्हणाला, ‘आपला वारसा पुढे न्यायचा आहे’

मुंबईत आयोजित ‘युथ शक्ती दहीहंडी’ कार्यक्रमात अभिनेता गोविंदाने सहभाग घेतला. यावेळी त्याने दहीहंडी हा केवळ खेळ नसून आपल्या संस्कृती आणि वारशाचा भाग असल्याचे म्हटले. गोविंदा म्हणाला, “जेव्हा हा उपक्रम होत असतो, तेव्हा तो केवळ एक खेळ नसतो. आपल्या सर्वांना आपल्या देशाचा वारसा पुढे न्यायचा आहे. आपण आपल्या मर्यादेत राहून पुढे कसे जाऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.” गोविंदाच्या या वक्तव्याची उपस्थितांमध्ये चर्चा झाली.

सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा

मराठा आंदोलकांनी अडवला

कामती येथील मराठा आंदोलकांनी पडळकरांचा ताफा अडवत विचारला जाब

मराठा आरक्षणाच्या मागणीवर पडळकरांनी भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी

मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, आंदोलकांची मागणी

“ज्या मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे” गोपीचंद पडळकर

खाडाखोड करून किंवा चुकीच्या नोंदी करून कुणबी दाखले घेण्यास पडळकरांचा विरोध

“यामुळे संपूर्ण समाजाला बदनामीला सामोरे जावे लागते” - पडळकर

“मराठा समाजाच्या भावना आमच्याही आहेत, आम्ही मराठा समाजासोबत”

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली भूमिका

ठाण्यात दहीहंडी उत्सवाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती

ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. यावेळी मुंबईचे प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तब्बल ९ थर रचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या दहीहंडी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोविंदा पथकाच्या या विक्रमी प्रयत्नामुळे उत्सवाचा उत्साह आणखी वाढला असून, परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दहीहंडीनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत फेरबदल; १७ मार्गांवर निर्बंध

दहीहंडी उत्सवा दरम्यान ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी १७ प्रमुख ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.टेंभी नाका, टॉवर नाका, संकल्प चौक, वागळे इस्टेट आणि बाळकुम, काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रमुख ठिकाणी गोविंदा पथक तसेच नागरिकांची गर्दी होणार असल्याने काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना प्रवेश देण्यात आला असून या प्रमुख मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. यादरम्यान हुल्लडबाजांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा,असे आवाहन वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

Raigad: माथेरानच्या अलेक्झांडर पॉईंटवरून दरीत पडून तरुणाचा मृत्यू 

रायगड -

- माथेरानच्या अलेक्झांडर पॉईंटवरून तरुण दरीत पडला

- 21 वर्षीय सोनू गौतमचा दुर्दैवी मृत्यू

- सुमारे 1500 फूट खोल दरीत आढळला मृतदेह

- सोनू जनकराम गौतम वय वर्ष 21 रा. जुना भेंडीपाडा, अंबरनाथ, जि. ठाणे असे मृत तरुणाचे नाव

Maharashtra Politics: सरकारने मनोज जरांगेंच्या सर्वच मागण्यांची दखल घेतली - विखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील -

सरकारने मनोज जरांगेंच्या सर्वच मागण्यांची दखल घेतली

कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही सुरू

न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय टिकावा यासाठी काळजी घेऊन अंमलबजावणी

परवा भेट घेऊन चर्चा झाली

मात्र त्यांनी आज उपचारास नकार दिला याचा मला धक्का बसला

Pune: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, पुण्यात झळकले बॅनर्स

पुणे -

लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार

पुण्यात झळकले एकनाथ शिंदेंचे बॅनर्स

Nashik: शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, हा निर्णय माझा स्वतःचा -  मंत्री दादा भुसे

नाशिक

- शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री.

- महत्त्वाचे निर्णय आता अधिकारी स्तरावर...

- हा निर्णय माझा स्वतःचा, मंत्री दादा भुसे..

- कामांची गर्दी होऊ नये, कामामध्ये सुटसुटीतपणा यावा म्हणूनच हा निर्णय घेतला.

Alibaugh: अलिबागच्या कुर्डुसमधील विहिरीवरची दहीहंडी ठरत आहे गोविंदाचे आकर्षण

अलिबागच्या कुर्डुस गावात दहीहंडीचा उत्सव आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा होतो. येथे विहीरीवर बांधलेली दहीहंडी उडी मारून फोडली जाते. हि आगळी वेगळी दहीहंडी फोडण्यासाठी आणि पहाण्यासाठी मोठ्या संख्येत दहीहंडी प्रेमी अलिबागच्या कुर्डुस या छोट्याशा गावात पर्यटक येतात.

Nagpur: नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती

नागपूर

- नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ......

- LPG गळतीची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यात आले.......

- प्रशासनाने वेळीच कारवाई करत गळतीवर नियंत्रण मिळवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली......

- सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, LPG वाहून नेणाऱ्या ट्रकच्या टँकला गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष 

पेणमध्ये ‘आई डे केअर’ संस्थेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विशेष दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. बौद्धिक अक्षमत्व असलेल्या तब्बल ६५ मुलांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर आणि पाण्याच्या फवाऱ्यांत चिंब भिजत मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. सामान्य मुलांप्रमाणे दहीहंडी फोडताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

बीडमध्ये पावसाचा मोठा खंड; उभी पिकं करपली, शेतकरी चिंतेत 

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकरी पुरताच अडचणीत आला असून शेतामधील सोयाबीन कपाशी तूर उडीद मूग बाजरी ही उभी पिक करपताना पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी अडचणीत आला असून चिंता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगरच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला उच्चांकी भाव; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. आज कांद्याला सरासरी ₹५,००० ते ₹५,५०० प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. अनेक दिवसांनंतर चांगला दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
योग्य प्रतवारी, आकार आणि दर्जानुसार वर्गवारी करून आणलेल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे.

पुण्यात दहीहंडी उत्सवातील पहिला गुन्हा; बिबवेवाडीतील मंडळावर पोलिसांची कारवाई

पुण्यात यंदाच्या दहीहंडी उत्सवातील पहिला गुन्हा बिबवेवाडी येथील श्रीकृष्ण तरुण मंडळावर दाखल करण्यात आला आहे. लाऊडस्पीकरसाठी ४ बेस आणि ४ टॉपची परवानगी असताना मंडळाने ८ बेस व ८ टॉप स्पीकर लावल्याचा आरोप आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या, प्रशासनाने दिली 50 हजारांची मदत 

मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायाने मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीला आता जिल्हा प्रशासनाची साथ मिळाली आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या अमृत-2 मॅरेथॉन स्पर्धेत रमाबाईंनी हलाखीच्या परिस्थितीतही धाव घेत विजय मिळवला होता. मुलींच्या शैक्षणिक शुल्कासाठी त्यांनी हा संघर्ष केला. त्यांच्या या मातृत्वाच्या जिद्दीची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी रमाबाईंचा सन्मान करत जिल्हा प्रशासनाच्या वतीने 50 हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द केली.

पुणे- डीजे,स्पीकर विरोधात परत एकदा पुणेकर रस्त्यावर उतरणार

डीजे स्पीकर कर्ण करकश आवाज विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार

उद्या सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकामध्ये रस्त्यावर उतरून केला जाणारा विरोध

MPSC पेपरफुटी प्रकरणात गणेश देवरे यांचा खुलासा; आरोप फेटाळले

MPSC पेपरफुटी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री नरहरी झिरवळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांनी आरोप फेटाळले आहेत. गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्याचे मान्य करत, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशाराही देवरे यांनी दिला आहे.

विद्यानंद बापट यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट; बापटांचा खुलासा

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्यांवरून नेमका कोणता मजकूर किंवा पोस्ट प्रसारित करण्यात येत आहे, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकारानंतर विद्यानंद बापट यांनी स्वतः प्रतिक्रिया देत त्यांच्या नावाने सोशल मीडियावर तयार करण्यात आलेली खाती बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. “माझ्या नावाने सर्व खाते बनवत आहेत. सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे कोणी काहीही करत आहे,” अशी प्रतिक्रिया विद्यानंद बापट यांनी दिली आहे.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या साठ्यात ४० टक्क्यांची घट

नाशिकच्या रामकुंडात चार मुलं बुडाली

मुंबईहून 40 जणांचा ग्रुप दर्शनासाठी नाशिकमध्ये आला होता

सकाळी गोदावरी नदीत स्नान करून शिर्डीला जाण्याचा होता नियोजित कार्यक्रम

गोदावरी नदीत स्नान करताना चार मुलं पाण्यात बुडू लागली

पाण्याचा अंदाज न आल्याने मुलांना बुडताना पाहून सोबतच्या नागरिकांनी तातडीने बचावकार्य केले

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलीस दलात 19 जणांची भरती; 5 टक्के आरक्षणाचा गैरफायदा

पुणे पोलीस दलात क्रीडा कोट्यातून भरती होण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याप्रकरणी 19 पोलीस शिपायांचा शोध सुरू आहे. कुराश आणि ड्रॅगन बोट खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा संशय आहे. ही प्रमाणपत्रे 3 ते 5 लाख रुपयांना विकली जात असल्याची माहिती असून, 500 ते 600 जणांना प्रमाणपत्रे दिल्याचा संशय आहे. आतापर्यंत 70 जणांची चौकशी करण्यात आली असून, गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. 2016 ते 2026 दरम्यान हा घोटाळा झाल्याचा संशय असून, यात क्रीडा आणि पोलीस दलातील काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता तपासली जात आहे.

शिरपूरच्या कळमसरे गावात घरफोडी; 2 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे, विशेष म्हणजे या चोरीच्या घटनेतील अज्ञात चोरट्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत, याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा वेगाने शोध घेत आहेत

पिंपरी चिंचवडमध्ये जुनी सांगवी परिसरामध्ये dj अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर- सामान्य नागरिकांना त्रासदायक असणाऱ्या अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी आता ॲक्शन मोडमध्ये येत अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. टीव्ही सेंटर परिसरातील प्यासा वाईन शॉपच्या खाली सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर सिडको पोलिसांनी छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे, मद्यपानासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही या ठिकाणी ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करून दिली जात होती.

सातारा-कराडमध्ये वाहतूक पोलिसांचा एकाच वेळी कारवाईचा धडाका

मॉडिफाय सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

मॉडिफाय सायलेन्सर, हॉर्नवर पोलिसांनी फिरवला बुलडोझर

शासनाकडे ३७० कोटींची थकबाकी; राज्यातील शासकीय रुग्णालयांतील MRI-CT स्कॅन सेवा ठप्प

शासनाकडे ३७० कोटींची थकबाकी; राज्यातील शासकीय रुग्णालयांतील MRI-CT स्कॅन सेवा ठप्प

चार दिवसांपासून तपासण्या बंद; रुग्णांचे हाल, उपचार रखडले! थकीत बिलांवरून कंपनीचा सरकारला थेट इशारा

Thane Sankalp Dahihandi  : ठाण्यातील संकल्प दहीहंडी उत्सवाला सुरुवात

ठाण्यातील संकल्प दहीहंडी उत्सव ला सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार रविन्द्र फाटक यांच्या माध्यामातून सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाचे 21 वे वर्ष आहे. गोविंदा पथकांची येण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai : मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात

मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात

मुंबईतील मानाची हंडी मानली जाणाऱ्या आयडियल बुक डेपो जवळील दही हंडी गोपिकांनी फोडली

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी पुलावर अपघात

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी पुलावर अपघात

कंटेनर पुलाच्या कढड्याला आदळला, चालक पडला पडला थेट नदीत

मोठ्या आवाजानंतर स्थानिक नागरिक मदतीला

पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीत पडलेल्या चालकाचा शोध

गंभीर जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात

अंजणारी पुलावरून एकेरी वाहतुक सुरु

Akola : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात आज पावसाने लावली हजेरी.

अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आली होती.

मात्र,आज सकाळपासून अकोला शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

Pandharpur : विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमी साजरी

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

मंदिरातील सभामंडपात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने पाळणा हलवण्यात आला.

त्या नंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. गोकुळाष्टमी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपारिक पोषक परिधान करण्यात आला आहे.

लातूर शहरात मध्यधुंद तरुणाने पोलिसांसमोर घातला राडा

लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना, काही मध्यधुंद तरुणांनी पोलिसांसमोरच जोरदार राडा घातल्याच समोर आले आहे,

पोलिसांच्या चार चाकी गाडीवर डोकं आपटून घेत हा राडा घातला,

याप्रकरणी इतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.

Washim Crime : पोलिस असल्याचे सांगत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले

वाशिममध्ये पोलिस असल्याची बतावणी करत नागरिकाला लुटणाऱ्या आरोपींचा कारनामा समोर आला आहे.

सोनखास रोडवर एका व्यक्तीला थांबवून पोलिस असल्याचे सांगत त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले

त्यानंतर हातचलाखीने दागिने बदलून तब्बल साडेसहा लाख रुपयांचे सोने लंपास

Pune : पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा पुणे फेस्टिव्हल यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात रंगणार आहे.

महोत्सवाचे भव्य उद्घाटन स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Jalna : जालन्यात गणेशोत्सवात डीजे वापरण्यास बंदी,ध्वनिप्रदूषण केल्यास होणार गुन्हे दाखल

जालन्यात गणेशोत्सवात डीजे वापरण्यास बंदी,ध्वनिप्रदूषण केल्यास होणार गुन्हे दाखल.

जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी काढले आदेश.

Santosh Pandit : संतोष पंडितच्या अटकेविरोधात पुण्यात आंदोलन

संतोष पंडितच्या अटकेविरोधात पुण्यात आंदोलन

गुडलक चौकात समर्थकांची गर्दी

पंडित यांच्या सुटकेची आंदोलकांकडून मागणी

अटकेच्या पद्धतीवरून पोलीस आणि सरकारला सवाल

Shirdi : साई मंदिरात श्रीकृष्ण जन्मसोहळा

साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपारीक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आले..

साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा सोहळा आजही मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय

Dahihandi 2026 : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव

आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी गोविंदा पथक सज्ज झालं आहे

ठिकठिकाणी दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com