Sara Ali Khan And Veer Pahariya Patchup Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan News : सारा आणि वीर पुन्हा एकत्र ? एक्स बॉयफ्रेंडसोबत साराचं पॅचअप?

Sara Ali Khan And Veer Pahariya Patchup Rumours : अभिनेत्री सारा अली खान हे बॉलिवूडमधील चर्चेतील नाव आहे. सारा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. जे मनात तेच तिच्या कायम ओठावर असतं, असं तिचे इंडस्ट्रीमधील अनेक मित्र सांगतात.

Rutuja Kadam

अभिनेत्री सारा अली खान हे बॉलिवूडमधील चर्चेतील नाव आहे. सारा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. जे मनात तेच तिच्या कायम ओठावर असतं, असं तिचे इंडस्ट्रीमधील अनेक मित्र सांगतात. तिचा हा बिनधास्तपणा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. त्याचमुळे सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग बघायला मिळते. हीच सारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तेही तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे... काय आहे कारण? नेमकं काय घडले त्या दोघांमध्ये जाणून घ्या...

अनंत आणि राधिका यांच्या लग्नसोहळ्या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. देशभरातील सेलिब्रिटी त्यासोबतच जगभरातूनही अनेक कलाकार या लग्नसोहळ्यात सहभागी झाले. यात सारा अली खान आणि इतर काही बॉलिवूडच्या कलाकार मंडळींनी नृत्याचं सादरीकरण केले. यामध्ये त्यांच्या काही मित्रमंडळींचाही समावेश होता. यातूनच एक नाव सध्या चर्चेत आलंय. ते म्हणजे....वीर पहारिया! सोशल मीडियावर सारा आणि वीर यांचा सोबत डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

पण, वीर नेमका आहे तरी कोण? एका मुलखतीदरम्यान, साराने वीरला डेट केल्याचं सांगितले होते. 2016 मध्ये सारा-वीरच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. मात्र लवकरच त्यांचे नाते तुटले. यानंतर, यावर्षी जान्हवीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सारा वीरसोबत डान्स करताना दिसली. ज्यामुळे दोघांमध्ये पुन्हा काहीतरी घडतंय, पॅचअप सुरू असल्याचा अंदाज अनेकांनी लावला. चाहत्यांमध्येसुद्धा ते दोघं पुन्हा येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीर कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर आणि वीर हे दोघे भाऊ आहेत.

शिखर पहारिया आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. जान्हवी कपूर आणि सारा अली खान हा चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. त्यामुळे जान्हवीच्या होणाऱ्या दीराला सारा डेट करणार, अशी मजेशीर कमेंट अनेक नेटकरी करत आहेत. या सगळ्यावर वीर किंवा सारा यांनी कुणीच अधिकृतरित्या बोललेले नाही.

काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि वीर पहारिया हे लंडनमध्ये धमाल करताना दिसून आले होते. त्या व्हेकेशनचे फोटो प्रचंड व्हायर झाले. यानंतर आता पुन्हा अनंत अंबानी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सारा आणि वीर एकत्र दिसलेत.

साराचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं होते. मध्यंतरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. सोशल मीडियावर देखील सारा कायम ॲक्टीव्ह असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT