Vicky Kaushal Interview : रणबीर कपूरच्या चित्रपटात काम करण्यासाठी विकी कौशलच्या मनात होती मोठी भीती होती? ६ वर्षानंतर केला खुलासा

Vicky Kaushal Shared Rajkumar Hirani Film Work Experience : विकी कौशलने ६ वर्षांनंतर रणबीर कपूरसोबत ‘संजू’ चित्रपटामध्ये काम करतानाचा अनुभव शेअर केलेला आहे. शिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबद्दलही त्याने भाष्य केले.
Vicky Kaushal And Ranbir Kapoor Sanju Movie
Vicky Kaushal And Ranbir Kapoor NewsSaam Tv
Published On

संजु बाबा म्हणजेच संजय दत्तच्या ‘संजू’ चित्रपटाचा हिट चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली होती. चित्रपटामध्ये, संजय दत्त यांची भूमिका रणबीर कपूरने तर संजय दत्तचा मित्र कमलेशची भूमिका विकी कौशलने साकारली होती. सध्या, विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने रणबीर कपूरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केलेला आहे. तब्बल ६ वर्षांनंतर त्याने हा अनुभव सांगितला आहे.

Vicky Kaushal And Ranbir Kapoor Sanju Movie
Mangala Movie : कधीही न ऐकलेली 'मंगला'च्या ॲसिड अटॅकची कथा रूपेरी पडद्यावर दिसणार, पाठमोरी असलेली अभिनेत्री कोण ?

राजकुमार हिरानी दिग्दर्शित, ‘संजू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०१८ मध्ये रिलीज झाला होता. दरम्यान, विकी कौशलने तब्बल ६ वर्षांनंतर रणबीर कपूरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केलेला आहे. नुकतेच अभिनेत्याने राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, "मी ‘संजू’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायचे म्हणून मी थोडा घाबरलो होतो. खरंतर, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फार कमी लोकांना मिळतो. त्यातल्या त्यात ते तीन वर्षांतून एकच चित्रपट बनवतात."

विकी कौशलने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, "त्यांची चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची शैली फार वेगळी आहे. त्यांनी आतापर्यंत जेमतेम चार ते पाच चित्रपटच बनवले आहेत. इतक्या मोठ्या सिनेकरियरमध्ये फार कमी चित्रपट त्यांनी बनवले आहेत. त्यांनी मला इतकी मोठी संधी दिल्यामुळे मी जरा घाबरलोच होतो. मी कसं काम करेल, कामामध्ये काही चुकी केली तर असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते."

Vicky Kaushal And Ranbir Kapoor Sanju Movie
Bhumi Pednekar Birthday : करियरच्या सुरूवातीला भूमी पेडणेकरने नाकारलेले २४ चित्रपट, नेमकं कारण काय ?

मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये विकीने सांगितले की, "त्यावेळी मी खूप घाबरलो होतो आणि पुढे कसं होईल हे मला माहीत नव्हते. मी स्वतःला सिद्ध करू शकेन का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये अनेकदा यायचा. शेवटी मनाची तयारी केली आणि शुटिंगला सुरूवात केली."

‘संजू’ मध्ये मुख्य भूमिकेत, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, करिश्मा तन्ना, मनीषा कोईराला, बोमन ईराणी, परेश रावल, जिम सार्भ सारखे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत होते. १०० कोटींचा बजेट असलेल्या ह्या चित्रपटाने ५८८ कोटींची जगभरामध्ये कमाई केलेली आहे.

Vicky Kaushal And Ranbir Kapoor Sanju Movie
Priyanka Chopra Birthday : १८ व्या वर्षीच मिळवला 'मिस इंडिया आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब, बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्राची क्रेझ कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com