Rakhi Sawant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखी सावंत होणार पाकिस्तानची सून, दोदी खान आहे तरी कोण?

Rakhi Sawant Third Wedding : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आता पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीचा तिचा टिकटॉक बंदी हटवा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. टिकटॉक बंदी हटवा नाहीतर मी पाकिस्तानला जाईन असे ती म्हणाली होती. आता पुन्हा एकदा राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ती तिसरे लग्न करणार असल्याचे सर्वत्र बोले जात आहे. राखी सावंत आता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

राखी सावंतचे नाव पाकिस्तानी अभिनेता दोदी खानसोबत (Dodi Khan) जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी दोदी खानने राखी सावंतसाठी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात तो राखी सावंतला म्हणतो की, "बस ये बताये की, बारात लेके इंडिया आना है या दुबई? लव्ह यू!" या व्हिडीओपासून राखी सावंत आणि दोदी खानच्या अफेरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. राखी सावंत आता लवकरच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

राखी सावंतने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, "ती पाकिस्तानी अभिनेता दोदी खानशी लग्न करणार आहे. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करत आहोत. मला दोदी खान खूप आवडतो. " आता नेटकऱ्यांना हा दोदी खान आहे तरी कोण? ज्याच्याशी राखी सावंत तिसरे लग्न करणार आहे. हे जाणून घेण्यास उत्सुकता लागली आहे.

दोदी खान कोण?

दोदी खान पाकिस्तानचा मोठा अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. अभिनयासोबतच दोदी खान फिटनेसकडे खूप लक्ष देतो. त्याला फिटनेसची खूप आवड आहे. तो मॉडेलिंग देखील करतो. राखी सावंतची या आधी देखील दोन लग्न झाली आहेत. तिचे आदिल खान दुर्रानीसोबतचे लग्न चांगलेच चर्चेत राहीले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT