MahaKumbh Mela: महाकुंभमेळ्यात शाहरूख खान? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?

Actor Shah rukh Khan In Kumbh Mela : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कुंभमेळा चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर एक कुंभ मेळ्याचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेता शाहरूख खान दिसत आहे.
Actor Shah rukh Khan
Actor Shah rukh Khan In Kumbh Mela Saam Tv
Published On

महाकुंभमेळ्यात शाहरुख खान गेलाय? शाहरुखने महाकुंभात स्नान केलं असा दावा करणारा मेसेज आणि त्याचे फोटोही व्हायरल केले जातायत. भगवे वस्त्र परिधान केल्याचं फोटोत दिसतंय. मात्र, खरंच शाहरुख महाकुंभात गेला होता का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान महाकुंभमेळ्यात भगवं वस्त्र परिधान करून पोहोचलाय. त्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले असून, रेसलर्ससोबत शाहरुख खान महाकुंभात स्नान करण्यासाठी गेल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, खरंच शाहरुख भगवं वस्त्र परिधान करून महाकुंभमेळ्यात गेलाय का...? काय आहे या फोटोमागचं सत्य? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात अमेरिकी रेसलर्स रोमन रेंस आणि रोंडा राऊजीसोबत भगवं वस्त्र परिधान करून शाहरुख खान सहभागी झाला. त्याने त्याचे फोटोही शेअर केलेत. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभ होतोय.आतापर्यंत करोडोंच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यात सहभागी झालेयत.सगळ्यात मोठं कुंभ असून 144 वर्षांनंतर इथे आयोजन होत असल्याचं म्हटलंय.

या कुंभमेळ्यात बिझनेसमन. सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ममता कुलकर्णींनी तर संन्यास घेतला.यासोबत सपना चौधरी, रेमो डिसूजानेही कुंभामध्ये स्नान केलं. मात्र, शाहरुख खान महाकुंभात गेल्याचं कुठेही दिसलं नाही...तसं त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही माहिती नाही...त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Actor Shah rukh Khan
Model Harsha Rishariya: मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

शाहरुख खान महाकुंभात गेलेला नाही

भगवं वस्त्र परिधान केल्याचा फोटो एआयच्या माध्यमातून बनवला

अमेरिकन रेसलर्स आणि शाहरुख कुंभात गेल्याचा दावा खोटा

लोकांची दिशाभूल करण्यासाठी AI फोटो व्हायरल

Actor Shah rukh Khan
Kumbh Mela Naga Sadhu: नागा साधूंच्या जटांचं काय असतं रहस्य, का नाही कापत केस? जाणून घ्या कारण

आता एआयच्या माध्यमातून असे अनेक फोटो व्हायरल केले जातात. मात्र, काहींना ते लगेच ओळखणं शक्य होत नाही आणि यावरून सोशल मीडियावर चर्चा होऊन पुढे वाद निर्माण होतात. मात्र, आमच्या पडताळणीत शाहरुख महाकुंभात गेल्याचा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com