
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा चालू आहे. या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात नागा सांधू आलेत. नागा सांधू कुंभमेळा नसताना कुठे राहतात. मेळ्यानंतर ते कुठे जातात. त्यांचा आहार काय असतो. याबाबतच्या गोष्टी अनेकांना कुतूहल आहे. त्यांचे लांब केस, दाढी आणि मिशांबाबत अनेकांना कुतूहल आहे. लांब केस असलेली नागा साधू तुम्ही नेहमीच पाहिले असतील. नागा साधू का केस कापत नाहीत? यामागे कारण काय ते जाणून घेऊ.
केस न कापणे हे सांसारिक बंधने, इच्छा आणि भौतिक सुखसोयी सोडल्याचं प्रतिक असतं. लांब केस असणं त्यांच्या साधना आणि तपश्चर्येचा भाग आहे. हिंदू मान्यतेनुसार, केस वाढू देणे आणि जटा तयार केल्यानं आध्यात्मिक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होत असते. जटा ध्यान आणि योगामध्ये फायदेशीर मानले जाते. केस आणि दाढी वाढू देणे हे त्यांचे निसर्गाशी आणि साधेपणाचे प्रतीक आहे.
हे त्यांच्या शिवभक्तीचे आणि साधनेचे लक्षण असतं. तसेच भगवान महादेवालाही जटाधारी म्हटलं जातं. महादेवाच्या लांब जटा आहेत. नागा साधू हे भगवान महादेवाची पूजा अर्चा करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ते लांब केस करत असल्याचीही मान्यता आहे. तर काही सांधूंच्या मते, त्यांनी केस कापले तर देवाचा कोप होतो. केस कापले तर त्यांची भक्ती अपूर्ण राहते. त्यांनी कितीही तपश्चर्या केली, त्याचे फळ त्यांना मिळत नाही, त्यामुळे नागा साधू हे कधीच केस कापत नाहीत.
नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप लांब आणि कठीण असते. साधकांना पंथात सामील होण्यासाठी साधारण ६ वर्षे लागतात. नागा साधू बनण्यासाठी साधकांना तीन टप्प्यांतून जावे लागते. त्यातील पहिला महापुरुष, दुसरा अवधूत आणि तिसरा दिगंबर असतो. जोपर्यंत अंतिम टप्पा येत नाही तोपर्यंत नागा साधू बनलेले नवीन सदस्य केवळ लंगोट परिधान करतात. कुंभमेळ्यात अंतिम टप्पा गाठल्यानंतर ते लंगोटीचा त्याग करतात आणि आयुष्यभर दिगंबर अवस्थेत राहतात.
जेव्हा एखादा नागा साधू बनतो तेव्हा त्याचे केस कापले जातात. त्यावेळी त्यांचे मुंडन केलं जाते. ते अखेरचं असतं, त्यानंतर ते आयुष्यभर केस कापत नाहीत. प्रयाग येथे झालेल्या कुंभातून दीक्षा घेतलेल्या नागा साधूला राजेश्वर म्हणतात. कारण ते त्यागानंतर राजयोग साधण्याची इच्छा बाळगतात. उज्जैन कुंभातून दीक्षा घेणाऱ्या साधूंना खूनी नागा म्हणतात. त्यांचा स्वभाव खूपच आक्रमक असतात. हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूंना बर्फानी म्हणतात, ते शांत स्वभावाचे असतात. तर नाशिक कुंभमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूला खिचडी नागा म्हणतात. त्यांचा कोणताही निश्चित स्वभाव नसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.