Shivani-Ambar : अखेर राजा राणी अडकले लग्नबंधनात; शिवानी झाली गणपुळेंची सून, पाहा PHOTOS

Shivani Sonar-Ambar Ganpule Wedding : 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता अंबर गणपुळेशी लग्नगाठ बांधली आहे.
Shivani Sonar-Ambar Ganpule Wedding
Shivani-Ambar SAAM TV
Published On

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणाचा साखरपुडा, कोणाचे लग्न तर कोणी आपल्या नात्याचा खुलासा करत आहेत. आता नुकतीच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) लग्नगाठ बांधली आहे. तिचा लग्नसोहळा अभिनेता अंबर गणपुळेसोबत (Ambar Ganpule ) थाटत पार पडला आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहेत.

शिवानी आणि अंबरच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या शिवानी आणि अंबरवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवानी आणि अंबर दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. यांनी लग्नात पारंपरिक लूक केला. शिवानीने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा आणि नाकात नथ घालून शिवानीचे सौंदर्य खुलले होते. तसेच तिने लूकला अनुरूप मॅचिंग ज्वेलरी परिधान केली होती.

अंबरने लग्नात शिवानीला मॅचिंग असा लूक केला होता. अंबरने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आणि गडद गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. दोघांच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवानी आणि अंबर आज (21 जानेवारी)ला लग्नबंधनात अडकले आहेत. शिवानी आणि अंबर यांनी गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला होता.

काही दिवसांपासून यांच्या घरी लग्नाआधीचे विधी पार पडत होते. शिवानी आणि अंबरने ग्रहमख, हळद, मेहंदी, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले. त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात सुरेख प्री वेडींग फोटोशूट देखील केले होते. शिवानी सोनारला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तर अंबर गणपुळे 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून प्रसिद्ध झाला.

Shivani Sonar-Ambar Ganpule Wedding
Amruta Khanvilkar : 'चंद्रा'ला चाहत्याने घातली लग्नाची मागणी; अमृता म्हणाली, मी तुझ्यासोबत लग्न...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com