Farzi 2 Shooting Delayed On Raashii Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farzi 2 Shooting Delayed: ‘फर्जी २’च्या शुटिंगला केव्हापासून सुरूवात होणार?, राशी खन्नाने दिली महत्वाची अपडेट

Farzi 2 Film: शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरीजच्या शुटिंगबद्दल अभिनेत्री राशी खन्नाने महत्वाची अपडेट दिली आहे.

Chetan Bodke

Farzi 2 Shooting Delayed On Raashii Khanna

शाहिद कपूरची ‘फर्जी’ वेबसीरीज कायमच चाहत्यांच्या आवडीची ठरलेली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ब्लॅक कॉमेडी, क्राईम आणि थ्रिलर ‘फर्जी’ वेबसीरीज गेल्या वर्षी ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली होती. आता चाहते या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप या वेबसीरीजच्या शुटिंगला सुरुवात झालेली नाही. वेबसीरीजच्या शुटिंगबद्दल अभिनेत्री राशी खन्नाने महत्वाची अपडेट दिली आहे. (Bollywood)

या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत शाहिद कपूर, राशी खन्ना, विजय सेतुपथि, के.के.मेनॉन, भुवन अरोरा सह अनेक तगडी स्टारकास्ट आहे. या सीरीजमध्ये राशी खन्नाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ विश्लेषकाचे पात्र साकारले आहे. या वेबसीरीजबद्दल अभिनेत्रीने न्यूज १८ ला मुलाखत दिलेली आहे. (Web Series)

अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली, “ ‘फर्जी २’ वेबसीरीजच्या शुटिंगला २०२५ पासून सुरुवात होणार आहे. कारण सध्या राज सर आणि डिके सरांकडे खूप कामं बाकी आहेत. सध्या ते दोघेही ‘सिटाडेल’, ‘हनी बनी’ आणि ‘द फॅमिली मॅन ३’ या प्रोजेक्टच्या प्रदर्शाच्या कामामध्ये आहेत. त्यानंतर ते ‘फर्जी २’ वर काम करतील.” (OTT)

यावेळी अभिनेत्रीने ‘फर्जी’मध्ये काम करतानाचा अनुभवही शेअर केलेला आहे. कामाचा अनुभव सांगताना राशी म्हणाली, “मला ‘फर्जी’मध्ये, शाहिद आणि विजय सेतुपति सरांसोबत काम करताना खूप मज्जा आली. मला त्यांच्याकडून खूप काही नवनव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. विजय सरांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यासोबतच शाहिद एक उत्तम अभिनेता असून तो एक विविधांगी अभिनेता म्हणून प्रभावशाली आहे.” (Bollywood News)

राज आणि डिके दिग्दर्शित ‘फर्जी’ वेबसीरिजचे कथानक बनावट नोटा बनवण्याच्या धंद्याभोवती फिरताना दिसत आहे. शाहिद बनावट नोटा बनवण्याच्या धंद्यामध्ये तो मास्टर असतो. त्याच्यासोबत त्याचा मित्र भुवन अरोरा तो ही त्याला या धंद्यामध्ये मदत करत असतो. तर राशी खन्ना खोट्या नोटा पकडण्यात मास्टर असते. तर विजय सेतुपति पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सीरिजच्या दुसऱ्या सीझनकडे प्रेक्षकांचं गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागलं आहे. मात्र असं असलं तरी, प्रेक्षकांना ‘फर्जी २’ रिलीज व्हायला अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Bharti Singh : भारती सिंहनं कसं घटवलं वजन? वाचा सीक्रेट डाएट प्लान

Pune Crime : पुण्यातील कॉलेजबाहेर तुफान राडा! टोळक्याकडून विद्यार्थीला बेदम मारहाण, वासा डोक्यात मारला अन्...

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक

Reliance Jio: रिलायन्स जिओचा नवा धमाकेदार प्लॅन, ४० जीबी डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन

गाडीच्या चाकाखाली आला चिमुकला; आईच्या किंचाळ्या ऐकून काळीज हादरेल

SCROLL FOR NEXT