Malaika Arora Shared Mystery Man Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Spain Trip : ब्रेकअपनंतर मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? स्पेनमध्ये करते मिस्ट्री मॅनला डेट, PHOTO केला शेअर

Malaika Arora Shared Mystery Man Photo : मलायकाने इन्स्टा स्टोरीमध्ये एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केलेला आहे. ब्लर फोटो तिने त्यासोबत शेअर केलेला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर नेमका तो मिस्ट्री मॅन कोण ? अशी चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अवघं बॉलिवूड राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये व्यग्र असताना एकटीच मलायका स्पेनमध्ये एकटीच सुट्टीचा आनंद लुटत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती परदेशामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. मलायकाने इन्स्टा स्टोरीमध्ये एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केलेला आहे. ब्लर फोटो तिने त्यासोबत शेअर केलेला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर नेमका तो मिस्ट्री मॅन कोण ? अशी चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलायका- अर्जुनच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अर्जुन कपूर अनंत- राधिकाच्या लग्नामध्ये गेला होता. पण मलायका एकटीच परदेशामध्ये, सुट्टीचा आनंद लुटत आहे. नेमकी ती स्पेनमध्ये कोणासोबत टाईम स्पेंड करते. अशी सर्वत्र चर्चा होत असताना, काही तासंपूर्वीच अभिनेत्रीने एका मिस्ट्री मॅनसोबत एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर खरंच मलायका- अर्जुनचा ब्रेकअप झालाय का ? अशीही जोरदार चर्चा सुरू होती.

Malaika Arora Shared Mystery Man Photo

मलायका अरोरा हिने काही तासांपूर्वी इन्स्टा स्टोरीवर स्पेनमधील व्हॅकेशन ट्रीपचे काही फोटो कोलाज बनवून शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये मलायकाने एक फोटो मिस्ट्री मॅनसोबतचा ही शेअर केलेला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनचा ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या मिस्ट्री मॅनचा चेहरा क्लिअर दिसत नाही. मिडिया रिपोर्टनुसार, ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहे.

गेल्या सात वर्षांपासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये, मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. यापूर्वीही अनेकदा मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाच्या चर्चा झालेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. त्यांना अरहान नावाचा मुलगाही आहे. जो मलायकासोबत राहतो. अरबाजने गेल्या काही दिवसांपूर्वी शुरा खानसोबत दुसरं लग्न केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

Maharashtra Live News Update : प्रकाश आंबेडकर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

Winter Makeup Tips: हिवाळ्यात लग्नानिमित्त मेकअप करताय? या गोष्टीची घ्या काळजी

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

SCROLL FOR NEXT