Vicky kaushal : विक्की कौशलने जिंकली मराठी मने; चाहत्यांना सांगितली शिवरायांची लाखमोलाची शिकवण

vicky kaushal on chhatrapati shivaji maharaj : विक्की कौशलने मराठी मने जिंकली आहेत. विक्की कौशलने चाहत्यांना शिवरायांची लाखमोलाची शिकवण दिली आहे.
विक्की कौशलने जिंकली मराठी मने; चाहत्यांना सांगितली शिवरायांची लाखमोलाची शिकवण
Vicky kaushalSaam tv
Published On

मुंबई : बॉलीवूडमधील सध्याच्या घडीचा ताकदीचा नट, अभिनेता कोण? असा प्रश्न विचारला तर अनेकांचं उत्तर एकच असेल विक्की कौशल... उरी.. द सर्जिकल स्ट्राईक, सॅम बहादूर अशा सिनेमामध्ये त्यानं वठवलेल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून विक्की कौशलनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'बॅड न्यूज' या हिंदी सिनेमातलं त्याचं तौबा, तौबा गाणं प्रचंड गाजत आहे. पण सध्या तो चर्चेत आला तो त्याच्या विधानामुळे... 'छावा द ग्रेट वॉरियर' हा सिनेमा येत्या डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या सिनेमाच्या सेटवरचा त्याचा संभाजी महाराजांच्या वेशभूषेतला फोटो समोर आला होता. तो पाहून सर्वांची उत्सुकता वाढली आहे. दाढी, गळ्यात रूद्राक्षांची माळ, पिळदार शरीर यामुळे संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत विक्की चपखल बसत आहे, यावर अनेकांनी मोहोर उमटवली. सर्वांनी त्याचं कौतुक केलं पण त्याच्या विधानाने त्याने मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला.

विक्की कौशलने जिंकली मराठी मने; चाहत्यांना सांगितली शिवरायांची लाखमोलाची शिकवण
Vicky Kaushal Interview : रणबीर कपूरच्या चित्रपटात काम करण्यासाठी विकी कौशलच्या मनात होती मोठी भीती होती? ६ वर्षानंतर केला खुलासा

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विक्की नेमकं काय म्हणाला ?

या सिनेमात संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडताना अनेक गोष्टींवर भर दिला आहे. त्यांचं जीवनकार्य, पत्नी राणी येसूबाई यांच्याशी त्यांचं नातं, त्यांचं बलिदान अशा अनेक घटनांनी परिपूर्ण असा हा सिनेमा आहे. ऐतिहासिक भूमिका पहिल्यांदाच माझ्या वाट्याला आली आहे आणि तीही संभाजी महाराजांची.. त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे. यासाठी प्रचंड मेहनत केली आहे, असं विक्की म्हणाला. यावेळी संभाजी महाराजांकडून काय शिकला ? ,असा प्रश्न विचारताच विक्कीने उत्तर दिलं आणि उपस्थितांची मनं जिंकली.

"लोकांसाठी कसं जगायचं ? ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि लोकांसाठी बलिदान कसं करावं ? हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं" विक्कीने हे उद्गार काढताच उपस्थितांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय... छत्रपती संभाजी महाराज की जय'चा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराज हा संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अभिमान आहे. त्याचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हेही तितकेच विलक्षण, निपुण, लढवय्ये, कुशाग्र बुद्धिमत्तेचे.. त्यांनी केलेल्या लढाया, त्यांचा पराक्रम, त्यांची अफाट कीर्ती देशातल्या जनतेसमोर मांडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उचललं आहे.

विक्की कौशलने जिंकली मराठी मने; चाहत्यांना सांगितली शिवरायांची लाखमोलाची शिकवण
Vicky Kaushal: बॉलिवूडचा 'हँडसम हंक' विकी कौशलचा रुबाब पाहिलात का?

याआधीही लक्ष्मण उतेकरांच्याच 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात विक्कीनं काम केलं होतं त्यामुळे पुन्हा 'छावा' सिनेमाच्या निमित्तानं ते एकत्र आले आहेत. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या सिनेमात रश्मिका मंधाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी अभिनेता संतोष जुवेकरही पाहायला मिळणार आहे. शिवाय अक्षय खन्ना, आशुतोष राणा यासह इतर कलाकारांची फौज या सिनेमात आहे.

मसान असो वा सॅम बहादुर विक्की सर्वांना भावला.. त्यानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, त्याची निवड अचूक आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या तमाम जनतेला या सिनेमाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com