मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावर आधारलेले कथानक प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यांच्या चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.
डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा 'लाईफलाईन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर रिलीज झाला होता, तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. अभिनेते अशोक सराफ आणि अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर यांच्यातील जुगलबंदी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच ट्रेलर रिलीज झालेला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना डॉक्टर आणि किरवंत यांच्यातील काही अंशी वाद पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये, डॉक्टर आणि किरवंतातील वाद पाहायला मिळत आहे. दोघांमध्येही ज्ञान आणि विज्ञान यावरून वाद होताना दिसत आहे. ज्ञान आणि विज्ञान जर एकत्र आले तर कित्येक गरजवंतांचे प्राण वाचतील, या मताचे डॉक्टर पाहायला मिळतील.
भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, हे दोघंच माणसांच्या आयुष्यात महत्वाचे आहेत. या विचारधारेचे किरवंत आहेत. विभिन्न विचारसरणीच्या असलेल्यांमध्ये या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.
अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. यांच्याशिवाय, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे आणि सुश्रुत मंकणी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत.
लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.