Kareena Kapoor And Saif Ali Khan News Instagram/ @kareenakapoorkhan
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor And Saif Ali Khan : करीना आणि सैफमध्ये का होतात भांडणं? बेबोने सर्व गोष्टींचाच केला खुलासा

Kareena Kapoor And Saif Ali Khan News : बॉलिवूडमधल्या फेमस कपलपैकी एक म्हणजे करीना कपूर खान आणि सैफ अली खान. नुकतंच करीनाने तिच्यात सैफमध्ये कोणत्या विषयावरून वाद होतात यावर भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडमधल्या फेमस कपलपैकी एक म्हणजे करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan). करीना आणि सैफने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांना तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) अशी दोन मुलं देखील आहेत. करीना अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करताना दिसते. अशातच सर्व आलबेल सुरू असताना करीना आणि सैफच्या संसाराविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वत: करीनानेच त्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

करीना आणि सैफच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. लग्नाला १२ वर्षे झाली असली तरी आजही त्यांच्यामध्ये, एसीच्या तापमानामुळे जोरदार वाद होतो. असा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. आम्हाला फॅमिलीसाठी वेळ काढणं आमच्यासाठी बऱ्याचदा कठीण होतं, त्यावरुन आमच्यात अनेकदा भांडणंही होतात. 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत करीनाने संसाराविषयी भाष्य केले आहे. ती म्हणाली, "आम्ही अनेकदा एसीच्या तापमानावरून लढत असतो. सैफला खूपच गरम होत असल्यामुळे त्याला १६ अंश सेल्सिअस तापमान हवं असतं. आणि मी अशीच राहते."

मुलाखतीमध्ये पुढे करीना म्हणाली, "मला माहित आहे की एसीच्या तापमानामुळेही अनेकांचे घटस्फोट झाले आहेत. त्यापेक्षा इतकं टोकाचं पाऊल न उचलण्यापेक्षा तुला १६ डिग्री तापमान लागतं, मला २० डिग्री तापमान लागतं. त्यापेक्षा तुझंही नाही माझंही नाही १९ डिग्री तापमान ठेवूया, जे फार वाईट नाही. आणि जर आमच्या घरी करिश्मा जरी आली तर ती चालाकीने २५ डिग्री तापमान करते. अनेकदा तिच्यात आणि सैफमध्येही कडाक्याचं भांडण होतं." सैफ अनेकदा करिश्माला मिश्किल टोमणेही मारत असतो.

शिवाय करीनाने मुलाखतीमध्ये वादाचं दुसरं कारणही सांगितलं आहे. ती म्हणाली, "आमच्यामध्ये अनेकदा वाद वेळेमुळेच होतात. आमच्यामध्ये इतर कोणत्याही कारणामुळे वाद होत नाहीत. दोघांकडेही कामामुळे वेळ नसतो. अनेकदा दोन ते तीन दिवस आम्ही दोघेही एकमेकांना पाहत नाहीत. त्यामुळेच आमचे भांडण होते. अनेकदा सैफ तैमुरला रात्री उशिरापर्यंत जागून देतो. त्यामुळेही आमच्यात काहीवेळा भांडणं होतात."

"सैफ पहाटे ४: ३० वाजता घरी येतो आणि मी नंतर शुटिंगवैगेरेसाठी निघून जाते. नंतर दुपारी सैफ शुटिंगला जातो. आम्ही एकाच घरात असूनही एकमेकांना भेटत नाही. दोघांच्याही व्यग्र टाईम शेड्यूल्डमध्ये आम्हाला वेळेचं नियोजन करता येत नाही. जेव्हा घरात दोन कलाकार असतात तेव्हा असंच होतं."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी! लाखांचं कर्ज झटक्यात, व्याज मात्र शून्य

Maharashtra Tourism : बॅग भरा अन् ट्रेकला चला, भावंडांसोबत भाऊबीजेला 'येथे' ट्रिप प्लान करा

Jio Diwali Offer: आली दिवाळी...जिओकडून २% मोफत सोने आणि १० लाखांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी

Zaira Wasim : 'दंगल गर्ल'नं गुपचूप उरकलं लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT