Kangana Ranaut With A Mystery Man Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Boyfriend Rumors: कंगना रणौतसोबत दिसणारा तो 'मिस्ट्री मॅन' कोण?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Kangana Ranaut News: गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत नेमकी कोणाला डेट करतेय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut With A Mystery Man

बॉलिवूडची पंगा गर्ल आणि बॉलिवूडची ड्रामा क्वीन कंगना रणौत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगनाचे २०२३ या वर्षामध्ये रिलीज झालेले एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत. सध्या कंगना तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत नेमकी कोणाला डेट करतेय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचं खरं उत्तर एका व्हिडीओतून नेटकऱ्यांना मिळालं आहे. एका व्हायरल फोटोमध्ये ती एका व्यक्तीचा हात पकडताना ती दिसतेय. (Bollywood News)

कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत सलूनमधून बाहेर पडतानाचा फोटो व्हायरल होत आहे. हा मिस्ट्री मॅन नेमका कोण आहे?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 'योगेश शहनशाह'या पापाराझीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

कंगना शुक्रवारी (१२ जानेवारी) एका सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिला काही पापाराझींनी स्पॉट केलं. यावेळी कंगनाने आकाशी रंगाचा वनपिस, मोकळे केस आणि ब्लॅक कलरचा गॉगल असा संपूर्ण लूक केला होता. तर कंगनासोबत असणाऱ्या मिस्ट्री मॅनने ब्लॅक कलरचा शर्ट, टी- शर्ट आणि जीन्स असा लूक केला होता. पण तो भारतीय नसून परदेशी व्यक्ती आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. (Bollywood Actress)

कंगनाचे मिस्ट्री मॅनसोबतचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बॉयफ्रेंड आहे का?, असा प्रश्न विचारत आहे. कंगानाला अनेकांनी बॉयफ्रेंड आहे का? तुझ्या बॉयफ्रेंडचे नाव काय? असा प्रश्न विचारला. पण ही परदेशी व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड नसून तो एक लोकप्रिय हेयर स्टायलिस्ट आहे. याला बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री फॉलो करतात. हे दोघेही एकमेकांना डेट करत नसून कंगना सलूनमधून बाहेर येऊन सहज त्याचा हात धरून आली. (Entertainment News)

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०२४ मध्ये तिचा 'इमर्जन्सी' हा पीरियड ड्रामा चित्रपट रिलीज होणार आहे. कंगना या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून ती स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या व्यतिरिक्त कंगना पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे, त्या चित्रपटामध्ये कंगना आर माधवनसोबत दिसणार आहे. (Bollywood Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT