Emergency Movie Release Date Postponed: ...म्हणून कंगनाने ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट पुढे ढकलली, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

Kangana Ranaut Film Release Date Postponed: ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. खुद्द अभिनेत्रीने पोस्ट करत प्रदर्शनाची तारीख बदलण्याचं कारण सांगितलं आहे.
Emergency Movie Release Date Postponed
Emergency Movie Release Date PostponedInstagram
Published On

Kangana Ranaut Emergency Movie Release Date Postponed

कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) मोस्ट अवेटेड ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie) मध्ये कंगनाने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींचे पात्र साकारत असून त्या चित्रपटाचं तिनेच दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख झाली होती. दरम्यान त्यावेळी निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर २०२३ ही तारीख जाहीर केली होती. पण आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकली आहे. (Release Date Postponed) अभिनेत्रीने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

Emergency Movie Release Date Postponed
Starfish Movie Wrap Up: लवकरच रुपेरी पडद्यावर घेता येणार समुद्र सफरीचा आनंद, मिलिंद सोमण-खुशाली कुमारच्या ‘स्टारफिश’चं शूटिंग पूर्ण

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना रनौतचा ‘चंद्रमुखी २’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर कंगनाचे ‘तेजस’ आणि ‘इमर्जन्सी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातीलच कंगनाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचा खुलासा केला आहे. तसेच कंगनाला ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय का घ्यावा लागला हे देखील सांगितले आहे.

कंगना ट्वीटमध्ये म्हणाली, “मित्रांनो, मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सीसाठी मी एक कलाकार म्हणून माझ्या संपूर्ण आयुष्याची शिकवण आणि कमाई पणाला लावली आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक व्यक्ती म्हणून माझ्या मुल्यांची आणि चारित्र्याची परिक्षा आहे. चित्रपटाच्या टीझरला आणि पोस्टर्सला चाहत्यांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्ही भारवून गेलो. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.”

Emergency Movie Release Date Postponed
Star Pravah Serials: ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अनिरुद्धने सांगितलं खरं कारण…

कंगना आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाली, “मी जिथे जाते तिथे लोक मला माझ्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल विचारतात. आम्ही २४ नोव्हेंबर २०२३ ही इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. पण माझ्या ‘बॅक टू बॅक’ रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे आणि बदलत्या तारखांमुळे २०२४च्या सर्वच तारखा ठरलेल्या आहेत. म्हणूनच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. लवकरात लवकर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. तोपर्यंत नेहमीच आमच्यासोबत संपर्कात राहा. चित्रपटासाठी तुमचा प्रतिसाद मोलाचा आहे.”

Emergency Movie Release Date Postponed
Kinjal Dave : खळबळजनक! फाल्गुनी पाठक दांडियापाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडियातही फसवणूक; चौघांना अटक

मणिकर्णिका फिल्म्स प्रस्तुत ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शन आणि निर्मिती कंगना रनौतने केली आहे. रितेश शाहची यांनी पटकथा लिहिली असून कथा कंगना रनौतची आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये कंगना देशाच्या माजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दिवंगत सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Emergency Movie Release Date Postponed
Kareena Kapoor - Saif Ali Khan: 'तू, मी आणि पिझ्झा...' लग्नाच्या वाढदिवशी करीना कपूरने सैफ अली खानसाठी केली खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com