Kinjal Dave : खळबळजनक! फाल्गुनी पाठक दांडियापाठोपाठ आता किंजल दवेच्या दांडियातही फसवणूक; चौघांना अटक

Kinjal Dave Dandiya Program: या दांडियासाठी बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Kinjal Dave Dandiya Program
Kinjal Dave Dandiya ProgramSaam Tv
Published On

Navratri 2023:

'दांडिया क्वीन' (Dandiya Queen) फाल्गुनी पाठकच्या दांडिया प्रोग्रामपाठोपाठ (Kinjal Dave Dandiya Program) आता किंजल दवेच्या (Kinjal Dave) दांडिया प्रोग्राममध्ये देखील फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याची घटना समोर आली आहे. या दांडिया प्रोग्रामसाठी बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. एमएचबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Kinjal Dave Dandiya Program
Tiger 3 Trailer Out: 'टायगर से दुश्मनी सबको भारी पडती हैं', सलमान-कॅटच्या 'टायगर ३' चा धमाकेदार ट्रेलर आऊट

आमदार सुनील राणे यांनी 'रंगरात्री दांडिया नाईट्स'चं आयोजन केले आहे. या दांडियासाठी बनावट पासेसची विक्री करण्यात आल्याचे समोर येताच पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. करण शाह, दर्शन गोहिल, परेश नेवरेकर आणि कविष पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.

'फर्झी' नावाची वेब सिरीज पाहून प्रोत्साहित होऊन आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १००० बनावट पासेस, १००० होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.

Kinjal Dave Dandiya Program
Sherika De Armas: माजी मिस वर्ल्ड कंटेस्टंटचे २६ व्या वर्षी निधन, धक्कादायक कारण आलं समोर...

दोन दिवसांपूर्वी दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या दांडिया प्रोग्राममध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. फाल्गुनीच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून तब्बल १५६ तरूणांची फसवणूक करण्यात आली आहे. या तरूणांना सव्वापाच लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. स्वस्तामध्ये पासेस देण्याचे तरूणांना आमिष दाखवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं.

Kinjal Dave Dandiya Program
Nikita Rawal: चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॉलिवूड अभिनेत्रीला लुटलं, घरातील रोख रक्कम आणि दागिने केले लंपास

बोरिवलीमध्ये राहणाऱ्या विशाल शाह या तरूणाने आपण फाल्गुनी पाठकच्या प्रोग्रामचा अधिकृत विक्रेता असल्याचे सांगितले. फाल्गुनीच्या दांडिया प्रोग्रामचा पास ४,५०० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे या तरुणांना सांगण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. ठरल्यानुसार सर्वांनी रक्कम देऊ केली. मात्र त्यानंतर विशाल शाहने मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती

Kinjal Dave Dandiya Program
Roadies Season 19 Winner: ‘रोडिज १९’च्या ट्रॉफीवर वाशु जैनने कोरलं नाव, तर शिवेत तोमर ठरला उपविजेता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com