बहुआयामी, अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची अशी बॉलिवूडमध्ये ओळख आहे. 'मिर्जापूर', 'बरेली की बर्फी', 'गुंजन सक्सेना' अशा वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींतून पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली.
सध्या अभिनेते पंकज त्रिपाठी आपल्या आगामी चित्रपटामुळे बरेच चर्चेत आले आहे. नुकतंच त्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बिझनेसमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अभिनेते असते तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीचे पात्र कोणीही दिले नसते, असं वक्तव्य पंकज त्रिपाठी यांनी आपल्या मुलाखतीत केलं आहे.
'एएनआय' वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “बॉलिवूड चित्रपटांनी आपल्या स्टिरियोटाईप करुन ठेवलं आहे. एखाद्या व्यक्तीची योग्यता नसतानाही त्याला ती भूमिका दिली जाते. डॉक्टर असा दिसणं अपेक्षित आहे. इंजिनियर असा दिसला पाहिजे. ज्युनियर आर्टिस्टच्या ऑडिशनसाठीही 'रिच लूक, कॉर्पोरेट लूक' अशा अटी ठेवली जाते. कतरिना कैफचा आपण डॉक्टरच्या भूमिकेसाठी विचार करतो. पण तुम्ही दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये जा. तिथे तुम्हाला किती कतरिना सापडतील?” असा सवाल त्यांनी केला.
पुढे पंकज त्रिपाठी उदाहरण देताना म्हणाले, “जर मुकेश अंबानी बिझनेसमन नसते तर, ते एक सेलिब्रिटी असते, असा विचार करा. जर ते ऑडिशनसाठी गेले असते तर, त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका केव्हाच मिळाली नसती. कारण त्यांचा लूक श्रीमंतासारखा किंवा रिच सारखा दिसत नाही, असं बोलून त्यांना चित्रपटातून काढून टाकलं असतं. 'रिच लूक' या शब्दाचा अर्थ आपल्याला देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत.” असं पंकज त्रिपाठी म्हणाले.
पंकज त्रिपाठी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले, “चित्रपटामध्ये एखाद्या भूमिकेसाठी त्याचा सखोल अभ्यास करुनच कलाकारांची निवड केली जाते. पण रियल लाईफमध्ये असं काही घडत नाही. पोलीस कसा दिसतो, श्रीमंत व्यक्ती कसा दिसतो? गरीब व्यक्ती कसा असतो? अशा अनेक चौकटी घालण्यात आल्या आहेत..”
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.