Sai-Piyush: 'बाईपण भारी देवा'साठी साई-पियूष यांचे कौतुक, 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया'चे ठरले 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023'

Forbes Magazine India: साई-पियूष हे 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया'या मॅगझिनचे 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023' ठरले आहेत. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील त्यांच्या कामाची दखल या मॅगझिनने घेतली आहे.
Sai-Piyush
Sai-PiyushSaam Tv
Published On

Baipan Bhari Deva Movie:

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साई-पियूष सध्या चर्चेत आले आहेत. साई-पियूष या जोडीवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. यामागचे कारण म्हणजे या जोडीच्या कामाची नोंद आता 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया'ने घेतली आहे. या प्रतिष्ठित मॅक्झिनमध्ये त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. साई-पियूष हे 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया'या मॅगझिनचे 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023' ठरले आहेत. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील त्यांच्या कामाची दखल या मॅगझिनने घेतली आहे. सध्या सर्व पातळीवरून या जोडीचं कौतुक होत आहे. गेल्या अनेक वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ साई-पियूषला मिळालं आहे.

साई-पियूष ही संगीत दिग्दर्शकाची जोडी मराठी मनोरंजन विश्वात गेली १५ वर्षांपासून कार्यरत आहे. 'मिशन पॉसिबल', 'रणभूमी' ,'ती अँड ती', 'आरॉन', 'अगं बाई अरेच्चा २', ' ख्वाडा', 'लग्न मुबारक', 'बाईपण भारी देवा', 'चौक' यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. त्याचसोबत 'दामोदर पंत', 'गेला उडत', 'ढॅण्टॅ ढॅण्ड', 'डोन्ट वरी बी हॅप्पी', 'के दिल अभी भरा नाही', 'अस्तित्व' या नाटकांनासुद्धा त्यांनी संगीत दलं आहे. तर, 'बन मस्का', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांना, 'कौन प्रविण तांबे' या हिंदी सिनेमाला आणि 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिंदी मालिकेला देखील या जोडीने संगीत दिलं आहे.

Sai-Piyush
Bhuvan Bam: 29 वर्षाच्या युट्यूबरचं स्वप्न पूर्ण, दिल्लीत खरेदी केलं 11 कोटींचं आलिशान घर

कलाकृतींच्या माध्यमातून साई-पियूष यांच्या कामाची चर्चा झाली, कौतुक झाले आणि त्यांच्यापर्यंत भरपूर काम येऊ लागले. पण नुकताच झालेल्या विशेष कौतुकामुळे त्यांच्या या आतापर्यंतच्या करिअर ग्राफला चारचाँद लागले आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' देवा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक साई-पियूष यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. यंदाच्या 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये त्यांच्या कामाची नोंद घेण्यात आली.

कळत नकळतपणे मिळालेला हा सुखद धक्का याविषयी व्यक्त होताना साई-पियूष यांनी सांगितले की, '२०२३ साली 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने आम्हाला भरपूर यश अनुभवायला दिलं. चांगल्या गोष्टी त्या चित्रपटामुळे आमच्या आयुष्यात घडल्या. गेली १५ वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतोय, अनेक चित्रपटातील गाणी हिट झाली. 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023' मध्ये एकंदरीत भारतीय संगीतकारांपैकी आमचं नाव तेथे होतं. जे सगळ्या रिजनल संगीतकारमध्ये फक्त आमचं नाव आहे ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे.'

'कष्ट, मेहनत आणि चांगलं काम झाल्यामुळे त्याची नोंद 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये झाली याचा आम्हाला अभिमान वाटतोय. 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये आमचं नाव येईल हे आमच्या मनी ध्यानीसुद्धा नव्हतं. या यशासाठी आम्ही 'बाईपण भारी देवा'चे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मनापासून आभार मानतो.', असं देखील या जोडीने सांगितले आहे. दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडा पाव', निखिल वैरागर दिग्दर्शित 'आंबट शौकीन' आणि अभ्यंघ कुवळेकर दिग्दर्शित 'गुलाबी' या आगामी मराठी चित्रपटातील गाण्यांना साई-पियूष यांनी संगीत दिले आहे. या मराठी सिनेमांमधून नवीन गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना आगामी काळामध्ये घेता येणार आहे.

Sai-Piyush
Nupur Shikhare: लग्नाच्या ठिकाणी जीम सूटवर ८ किलोमीटर का धावला?; आयरा खानचा पती नुपूर शिखरेनं सांगितलं भावनिक कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com