Kajol SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

Maharashtra State Film Awards : 'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात काजोलने मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा नुकताच पार पडला.

'राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यात काजोलने मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' (Maharashtra State Film Awards ) सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक मोठ्या कलाकारांना येथे सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड मनोरंजनसृष्टी गाजवलेल्या काजोलला चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024' प्रदान करण्यात आला आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

काजोल (Kajol) पुरस्कार सोहळ्याला आपल्या आईची साडी नेसून आली होती. तसेच काजोलची आई देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. काजोलने पुरस्कार घेतल्यानंतर मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. काजोल नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

काजोल म्हणाली की, "नमस्कार सगळ्यांना... आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाला मी येथे या मंचावर इतक्या मोठ्या लोकांबरोबर उभी आहे. माझे भाषण आधीच झालं आहे. अनुपमजींनी जे माझ्यासाठी इतके चांगले भाषण केल्या त्यानंतर मी काय बोलू... पण मी इतकं बोलेन की, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे... कारण आज माझी आई येथे बसली आहे. मी आज तिची साडी नेसली आहे. हा पुरस्कार माझ्याआधी तिला मिळाला होता. त्यामुळे माझ्या वाढदिवसादिवशी इतकं मोठं गिफ्ट असूच शकत नाही."

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024' ने सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही गौरवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : उत्साहात दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT