'इंद्रायणी' मालिकेत आता निर्णायक वळण पाहायला मिळत आहे.
दिग्रसकरांच्या गादीचा मान अधोक्षजला मिळणार असल्याची घोषणा आनंदीबाईंनी केली आहे.
'इंद्रायणी' च्या येणाऱ्या भागांमध्ये खरंच अधोक्षज दिग्रसकरांच्या गादीवर बसणार का? पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सध्या मालिकांमध्ये श्रावण स्पेशल भाग पाहायला मिळत आहे. मराठी मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. 'इंद्रायणी' (Indrayani) मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला मिळणार? यावरून चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या मंदिरात निर्णायक संघर्ष रंगणार आहे.
दिग्रसकर वंशपरंपरेची गौरवशाली गादी जिच्यावर बसण्याचा मान मिळणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. त्या गादीभोवती आज सगळे गाव जमा झाले आहे. यंदा केवळ वंशाच्या आधारावर हा निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गावकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने अधोक्षजचा किर्तन सोहळा ऐकायला जमणार असून त्याच्या वाणीतील अडखळण्यामुळे तो चेष्टेचा विषय बनणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्यासपीठावर उभे राहून आपल्या मर्यादा स्वीकारणार अधोक्षज आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी असलेली इंदू सध्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. गादीवर कोण बसेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण ज्याने विठ्ठलावर निष्ठा ठेवून भक्तीमार्ग सोडला नाही, त्याचाच विजय होईल असे गावात बोले जात आहे. हा केवळ एक गादीचा वाद नसून परंपरा आणि श्रद्धेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. अधोक्षजला गादीवर बसवण्याचे आनंदीबाईंचे स्वप्न पूर्ण होणार का? हे येणाऱ्या भागांमध्ये मालिकेत पाहायला मिळेल.
अधोक्षजला पाठिंबा देताना इंदू स्वतःवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरी जाताना दिसत आहे. इंदूची भक्ती, तिचे कर्तृत्व आणि तिचे संकल्प आणि बळ आता केवळ तिच्या नवऱ्यापुरता मर्यादित न राहता गावाच्या भवितव्यावर परिणाम करणारे ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा 'दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला मिळणार?' याकडे लागल्या आहेत. 'इंद्रायणी' मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.