Roshni Walia : "काहीही कर पण प्रोटेक्शन वापर..."; प्रसिद्ध अभिनेत्रीला आईने दिला सल्ला

Roshni Walia Mother Advice : 'सन ऑफ सरदार 2'ची अभिनेत्री रोशनी वालिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीत आईने दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Roshni Walia Mother Advice
Roshni Walia SAAM TV
Published On
Summary

अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालत आहे.

'सन ऑफ सरदार 2'ची अभिनेत्री रोशनी वालिया तिच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

रोशनी वालियाने मुलाखतीत आईने दिलेला सल्ला सांगितला आहे.

अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' (Son of Sardaar 2) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगलीच जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. अजय देवगनसोबत मुख्य भूमिकेत मृणाल ठाकूर झळकली आहे. अशात आता चित्रपटातील एक अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. "काहीही कर पण प्रोटेक्शन वापर" असा सल्ला आईने दिल्याचा खुलासा रोशनी वालियाने मुलाखतीत केला आहे.

अभिनेत्री रोशनी वालियाने (Roshni Walia ) एका मुलाखतीत सांगितले की, "मी आईशी कधीच खोटे बोले नाही. माझी आई सिंगल मदर आहे. माझा आणि माझ्या बहिणाचा सांभाळ आईने एकटीने केला आहे. माझ्या आई-वडिलांचा खूप आधी घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे आमची सर्व जबाबदारी आईने घेतली. मात्र तिने कधीच आम्हाला बंधनात ठेवले नाही. "

पुढे रोशनी म्हणाली, "मी आज जी काही यशस्वी आहे ते माझ्या आईमुळेच आहे. तिने मला चांगले संस्कार दिले. स्वातंत्र्य आणि मार्गदर्शन या गोष्टी दिल्या. आईने नियम लावले पण ते आजच्या काळाला अनुसरून होते. ज्याचा कधीच दबाव वाटला नाही. आई कायम म्हणते, काहीही कर पण प्रोटेक्शन वापर...तिने प्रोटेक्शन किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. तिने हे सर्व माझ्या मोठ्या बहिणीला देखील सांगितले आहे."

शेवटी रोशनी म्हणाली, आई मला म्हणते एन्जॉय कर, पार्टीला जा, मजा कर... रात्री घरी का आहेस? तू दारू नाही प्यायलीस का? माझे असे मत आहे की, कडक शिस्त असलेल्या पालकांची मुलं जास्त बिघडलेली असतात. माझ्या आईसारख्या पालकांची मुलं कमी बिघडलेली असतात. कारण ते एकमेकांसोबत सर्व गोष्ट शेअर करतात. 'सन ऑफ सरदार 2' मध्ये रोशनी वालियाने सबाची भूमिका साकारली आहे.

Roshni Walia Mother Advice
Hansika Motwani-Sohael Kathuria : मैत्रिणीच्या नवऱ्याशी केलं लग्न, ३ वर्षांतच अभिनेत्रीवर आली घटस्फोटाची वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com