ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोशनी वालिया ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
रोशनी २३ वर्षांची आहे आणि चित्रपटातील तिची भूमिका देखील खास असणार आहे.तिने इंस्टाग्रामवर चित्रपटातील कलाकारांसह अनेक पोस्ट पोस्ट केल्या आहेत.
रोशनीचा जन्म उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे झाला आहे. तीने तीचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराजमध्ये घेतले आणि पुढिल शिक्षणाकरिता मुंबईला आली.
रोशनीला लहानपणा पासून अॅक्टिंगची आवड आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली.
२०१२ मध्ये रोशनीने मैं लक्ष्मी तेरे आंगन या सिरिअल मधून तीने सुरूवात केली. तीने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले.
यानंतर रोशनीने 'बालिका वधू', 'देवों के देव...महादेव', 'भारत के वीर पुत्र-महाराणा प्रताप', 'ये वादा रहा' सारख्या सिरिअलमध्ये काम केले.
रोशनी इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव आहे आणि तिचा मोठा चाहता वर्ग आहे. रोशनी गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे.
रोशनी 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. ती म्हणते की ती पहिल्यांदाच मोठ्या स्टार्ससोबत काम करत आहे.