State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Maharashtra State Marathi Film Awards2025 : मराठी चित्रपटसृष्टीसाठी मानाचा महाराष्ट्र राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये ५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
Maharashtra State Marathi Film Awards2025
Maharashtra State Marathi Film Awards2025Saam Tv
Published On

Maharashtra State Marathi Film Awards2025 : मराठी चित्रपटसृष्टीसाठी मानाचा महाराष्ट्र राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये ५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यंदा राज्य सरकारतर्फे ६० वा आणि ६१ वा असे दोन वर्षाचे राज्य चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि ३० लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

Maharashtra State Marathi Film Awards2025
Shreya Bugde: 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनमध्ये श्रेया बुगडेला आली भाऊ कदम आणि निलेश साबळेची आठवण; म्हणाली...

त्याचबरोबर, चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच युनेस्कोच्या यादीत मानांकन मिळवून देणारे विशाल शर्मा यांना देखीलछत्रपती शिवाजी महाराज वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Maharashtra State Marathi Film Awards2025
Dhanush: 'रांझणा'चा क्लायमॅक्स एआयने बदलल्यामुळे सुपरस्टार धनुषने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, हा तो चित्रपट...

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवानिमित्त खास स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाने सजलेला ‘रंगतरंग’ कार्यक्रमही सादर उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले होते, तर प्रसाद ओक आणि अमृता सुभाष यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com