Toxic Movie saam tv
मनोरंजन बातम्या

Toxic Movie : कियारा अडवाणीनंतर 'या' बॉलिवूड स्टारची 'टॉक्सिक'मध्ये दमदार एन्ट्री; पहिला लूक चर्चेत, कोणती भूमिका साकारणार?

Bollywood Star Entry In Toxic Movie : कियारा अडवाणीनंतर आणखी एका बॉलिवूड स्टारची 'टॉक्सिक' चित्रपटात धमाकेदार एन्ट्री झाली आहे. पहिल्या लूकचे पोस्टर समोर आले आहे.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता यश सध्या त्याच्या 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही 'टॉक्सिक'मध्ये झळकणार आहे.

कियारानंतर आणखी एक बॉलिवूड स्टार 'टॉक्सिक'चा भाग असणार आहे.

साऊथ अभिनेता यशचा (South Superstar Yash) मोठा चाहता वर्ग आहे. सध्या यश त्याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' (Toxic) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची एन्ट्री झाली. तिचा फर्स्ट लूक समोर आला. आता कियारानंतर आणखी एक बॉलिवूड स्टार यशसोबत झळकणार आहे. ज्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

कियारा अडवाणीनंतर 'टॉक्सिक' चित्रपटात झळकणारा बॉलिवूड स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेत्री हुमा कुरैशी आहे. काल (28 डिसेंबर) ला हुमा कुरैशीचा चित्रपटातील पहिला लूक शेअर करण्यात आला. हुमा 'टॉक्सिक' मध्ये 'एलिझाबेथ' ची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका विंटेज काळ्या कारसमोर काळ्या रंगाच्या स्टायलिश गाऊनमध्ये हुमा कुरैशी उभी आहे. तिचा हा किलर लूक पाहून चाहते चित्रपटासाठी अधिक उत्सुक झाले आहेत.

हुमा कुरैशीच्या लूक पोस्टला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "'अ टॉक्सिक फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' मध्ये एलिझाबेथच्या भूमिकेत हुमा कुरेशीला सादर करत आहोत..." तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करत आहे. नवीन वर्षात आपल्याला मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. आजवर हुमा कुरैशीने अनेक चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिची 'दिल्ली क्राइम', 'महाराणी' वेब सीरिज खूप गाजली.

'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख

'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख 19 मार्च 2026 आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी चित्रित केला जात आहे. तर हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहन दास आणि निर्माते वेंकटनारायण आणि यश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? पगार कितीने वाढणार? वाचा

Jalna : तलाठ्याला जालन्यात बेदम मारहाण, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाईवेळी राडा

Mumbai Horror: मुंबईत माणुसकीचा कळस गाठणारी क्रूरता, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Weight Loss Tips: जीम किंवा डाएट न करताही अडीच महिन्यात कमी करू शकता 10 किलो वजन; डॉक्टरांनी सांगितले ३ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT