'बिग बॉस 19'मध्ये प्रणित मोरे दुसरा रन-रप ठरला.
प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते.
प्रणित मोरेने मुंबईत आई-वडिलांसाठी आलिशान घर खरेदी केले आहे.
महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा दुसरा रन-रप ठरला. महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेने तीन महिन्यात 'बिग बॉस १९' चे घर गाजवले आहे. प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडी, युट्यूबर, कंटेंट क्रिएशन करतो.
बिग बॉसच्या घरात असताना प्रणितने आपल्या मुंबईतील नवीन घराचा उल्लेख केला होता. त्याने आई-वडिलांसाठी मुंबईत घर खरेदी केले. याची एक झलक सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रणितचे नवीन घर खूप आलिशान आणि सुंदर आहे. प्रणितच्या नवीन घराचा व्हिडीओ Solace Studio या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. जो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
प्रणितच्या आलिशान घराच्या दारावर एक खास नेमप्लेट लावली आहे. त्याने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. घराच्या दारावर प्रणितच्या आई-वडिलांच्या नावांची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. आपले घर पाहताच प्रणितच्या आई-वडीलांना खूप आनंद झाला आहे. प्रणितच्या वडीलांचे नाव सत्यवान मोरे तर आईचे नाव वनिता मोरे असे आहे. नेमप्लेट सुंदर सजवली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोठा हॉल, प्रसन्न देवघर, रुम, मॉड्यूलर किचन दिसत आहे. घर खूप मोठे आणि प्रशस्त आहे. घरात आकर्षक अशा सजावटीच्या वस्तूही पाहायला मिळत आहेत. घराचे रंगकाम आणि इंटेरिअर सुरेख आहे. एकंदर प्रणितचे मुंबईतील घर खूपच आलिशान आणि लग्जरी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.