Drishyam 3-Akshaye Khanna : 'दृश्यम 3'चा निर्माता अक्षय खन्नावर भडकला, चूक दाखवत म्हणाला- "त्याच्या डोक्यात हवा गेलीय..."

Drishyam 3 Producer On Akshaye Khanna : अक्षय खन्नाने 'दृश्यम 3' चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर चांगलेच भडकले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Drishyam 3 Producer On Akshaye Khanna
Drishyam 3-Akshaye Khanna saam tv
Published On
Summary

अक्षय खन्नाचे 'धुरंधर' चित्रपटातील गाणे सध्या चांगलेच गाजत आहे.

अक्षय खन्नाने नुकतीच 'दृश्यम 3' मधून एक्झिट घेतली आहे.

अक्षय खन्नाने 'दृश्यम 3' अचानक सोडल्यामुळे निर्माते प्रचंड भडकले आहेत

'धुरंधर' स्टार अक्षय खन्ना सध्या 'दृश्यम 3' मुळे चांगला चर्चेत आहे. अक्षय खन्नाने 'दृश्यम 3' मधून एक्झिट घेतल्यामुळे चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्याच्या अव्यावसायिक वर्तनाबद्दल निर्मात्यांनी तक्रार दाखल केली आहे. अक्षय खन्नाचे 'दृश्यम 3'सोडण्या मागचे खरे कारण समोर आले आहे. तसेच निर्मात्यांनी अक्षय खन्ना बद्दल स्पष्ट मत दिले आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत 'दृश्यम 3'चे निर्माते कुमार मंगत पाठक म्हणाले की, "अक्षय खन्नाने असे अचानक चित्रपटामधून एक्झिट घेतल्यामुळे माझे नुकसान झाले आहे. मी त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करून त्याला लीगल नोटीस पाठवली आहे. मात्र त्याने अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही...अक्षय खन्नाच्या डोक्याचत हवा गेली आहे. तो सेटवर टॉक्सिक वागायचा. त्याला मी 'सेक्शन ३७५' ची संधी दिली जेव्हा तो कोणतेही काम करत नव्हता. त्यानंतर त्याला 'धुरंधर' आणि 'छावा' चित्रपट मिळाले. त्यापूर्वी तीन-चार वर्षं तो घरी बसून होता..."

अक्षय खन्नाचे चित्रपट सोडण्याचे मुख्य कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार अक्षय खन्नाचे 'दृश्यम 3' चित्रपट सोडण्याचे मुख्य कारण एक 'विग' आहे. यावर निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सांगितले की, "'दृश्यम 2' चा शेवट झाला तेथून 'दृश्यम 3'ची काहाणी सुरू होणार आहे. त्यामुळे जर दुसऱ्या भागात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर केस नसतील, तर अचानक तिसऱ्या भागामध्ये डोक्यावर केस कसे येतील. आजपर्यंत असे कुठलंही तंत्रज्ञान आले नाही की ज्याच्या मदतीने एखाद्या केस नसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक केस येऊ शकतील..." अक्षय खन्नाने चित्रपट सुरू होण्याच्या 10 दिवस आधी चित्रपटातून एक्झिट घेतली.

'दृश्यम 3' मध्ये नवा कलाकार कोण?

'दृश्यम 3'च्या निर्मात्यांच्या म्हणण्यांनुसार, 'धुरंधर' आणि 'छावा'मध्ये अक्षय खन्ना मुख्य हिरोच्या भूमिकेत नसून त्याने छोटी खलनायकाची भूमिका साकारली आहे. जर त्याने नायक म्हणून काम केले तर तो चित्रपट 50 कोटींचीही कमाई करू शकणार नाही.'दृश्यम 3' मधील अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर अभिनेता जयदीप अहलावत त्याची भूमिका साकारणार आहे. यावर 'दृश्यम 3'च्या निर्माते म्हणाले की,"सुदैवाने आम्हाला आता चांगला अभिनेता, उत्तम माणूस भेटला आहे..."

Drishyam 3 Producer On Akshaye Khanna
Star Pravah Serials : नव्या वर्षात नवा बदल; स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांची वेळ बदलली, वाचा वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com