Star Pravah Serials : नव्या वर्षात नवा बदल; स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांची वेळ बदलली, वाचा वेळापत्रक

Star Pravah Serials Time Change : स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक आताच नोट करा आणि आवडत्या मालिका पाहा.
Star Pravah Serials Time Change
Star Pravah Serialssaam tv
Published On
Summary

स्टार प्रवाह वाहिनीवर जानेवारीपासून दोन नव्या मालिका सुरू होणार आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.

तसेच स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर जानेवारी महिन्यात दोन मालिका सुरू होणार आहे. पहिली 'तुझ्या सोबतीने' , दुसरी 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या मालिकांचे वेळापत्रक आता बदलले आहे.

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही नवीन मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. आता या मालिकेच्या वेळेत रेश्मा शिंदेची 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका प्रसारित होते. त्यामुळे सोशल मीडिया 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका संपणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. मात्र आता यावर स्वतः रेश्माने उत्तर दिले आहे. जानकी आणि हृषिकेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या मालिकेची वेळ बदल्याचे सांगितले आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' मालिका 5 जानेवारीपासून दररोज रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. कारण 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या खूपच भन्नाट वळण पाहायला मिळत आहे. जानकी आणि हृषिकेशची लग्ना आधीची गोष्ट पाहायला मिळत आहे.

मात्र सध्या रात्री 10:30 वाजता 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' ही मालिका प्रसारित होते. पण बदललेल्या वेळापत्रकामुळे आता ही मालिका केव्हा प्रसारित होणार की मालिका संपणार? हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. सध्या चाहते 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेसाठी उत्सुक आहेत. या मालिकेतून पुन्हा एकदा मधुराणी प्रभुलकर प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे.

Star Pravah Serials Time Change
Tara Sutaria Video : अभिनेत्रीला पाहून गायकाला लागलं याड; Live कॉन्सर्टमध्ये केलं Kiss, बॉयफ्रेंड वीर पहारिया संतापला, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com