New Serial: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत झळकणार 'हे' कलाकार; 'या' दिवशी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

New Serial: स्टार प्रवाहची नवी ऐतिहासिक मराठी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेची कथा, कलाकार, प्रसारण वेळेची सविस्तर माहिती वाचा.
New Serial
New SerialSaam Tv
Published On

New Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवीन मराठी मालिका ५ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका भारतातील महान समाजसुधारिक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या संघर्ष आणि सामाजिक बदलासाठी केलेल्या कार्याला चंदेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

नवीन मालिका सुरू होण्यापूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने नवीन प्रमो व्हिडिओ रिलीज केला आहे. या मालिकेची वेळ आणि कलाकारांची यादीही जाहीर केली आहे. मालिकेचा प्रसारण स्लॉट सायंकाळी ७:३० वाजता ठेवण्यात आला आहे. जो सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेचा आहे. आता या नवीन मालिकेमुळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेची वेळ किंवा तिचा समारोप होईल का? हे पुढील घोषणेत स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.

New Serial
Baseer Ali: 'मला एकटं सोड मी कंटाळलोय...'; बिग बॉसनंतर बसीरचे बदलले रंग, नेहलसोबत संपवलं नातं

या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त चैत्राली गुप्ते, स्वप्नील राजशेखर, सुनील गोडबोले, सविता मालपेकर आणि बालकलाकार तक्षा शेट्टी यांसारख्या अनुभवी कलाकारांची कास्ट या मालिकेत पाहायला मिळेल.

New Serial
Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ने केली २०० कोटींच्या कल्बमध्ये एन्ट्री; धनुषच्या 'तेरे इश्क में'ने किती केली कमाई

ही मालिका सामाजिक सुधारणा, स्त्रीशिक्षण, समाजातील रूढीवादी विचारांशी संघर्ष यांच्यावर आधारित आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतभर मुलींच्या शिक्षणाला व सामाजिक समतेला मोठा पाठबळ मिळाला. यामुळे इतिहासातील या महान व्यक्तिमत्त्वाची कथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर चर्चेत येईल. अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com