Gharoghari Matichya Chuli: रेश्मा शिंदेच्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत रंगणार श्री आणि सौ स्पर्धा

Gharoghari Matichya Chuli: घरोघरी मातीच्या चुली मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत लवकरच श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Gharoghari matichya chuli
Gharoghari matichya chuliPR
Published On

Gharoghari Matichya Chuli: स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत लवकरच श्री आणि सौ स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये मुळशी मधील अनेक उद्योजक सामील होणार असून जानकी - ऋषिकेश, ऐश्वर्या - सारंग आणि अवंतिका - सौमित्र देखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या जोडीला २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुळशी मध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

श्री आणि सौ स्पर्धेत वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. मात्र ते टास्क कोणते असतील याची कल्पना मात्र ऐनवेळी देण्यात येणार असल्यामुळे स्पर्धा नक्कीच आव्हानात्मक असेल. पहिली फेरी असणार आहे पाककला स्पर्धा. जानकी सुगरण आहेच मात्र ही फेरी जानकी जिंकू नये म्हणून ऐश्वर्याने पूर्ण बंदोबस्त केला आहे. त्यामुळे श्री आणि सौ स्पर्धेची पहिली फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Gharoghari matichya chuli
Dhanashree Verma: चहलसोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, धनश्री वर्माने केले 'हे' खास काम; म्हणाली, 'हे माझे पहिले...'

हा खास प्रसंग शूट करण्यासाठी कलाकारांसोबतच मालिकेची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. भर उन्हात शूट करण्याचं आव्हान तर होतंच पण त्यासोबत संवाद पाठ करता करता पदार्थ बनवण्याचीही कसरत सुरु होती. दिग्दर्शक राहुल लिंगायत यांनी उत्तमरित्या हा सीन कलाकारांना समजावला आणि हा सीन साकारण्यासाठी कलाकारांनीही कंबर कसली.

Gharoghari matichya chuli
Saif Ali Khan: सैफ अली खान काय लपवतोय? त्या रात्री नेमकं काय घडलं होत, चाहत्यांचा प्रश्न

तेव्हा घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ही चुरस अनुभावायची असेल तर दररोज पाहायला विसरू नका लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी वाजता ७.३० फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com