Hina Khan Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Hina Khan : 'आयुष्यात आलेला वाईट क्षणही...', कॅन्सरचं निदान झाल्यानंतर हिना खानची नवी पोस्ट चर्चेत

Hina Khan Post : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं आहे. आता त्यानंतर अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे.

Chetan Bodke

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान सध्या तिच्या हेल्थमुळे चर्चेत आली आहे. अनेकदा सोशल मीडियावर तिला कॅन्सर झाल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले. आता त्यानंतर अभिनेत्रीने आणखी एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.

अभिनेत्री हिना खान हिने काही तासांपूर्वीच एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. “आयुष्यात आलेला हा खडतर टप्पादेखील निघून जाईल” असं म्हणत हिनाने एक स्टोरी शेअर केली आहे. आणि पुढे एक स्माईली आणि हार्ट इमोजी काढले आहे. रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटातील ‘कर हर मैदान फतेह’ गाणं लावून ही पोस्ट शेअर केली आहे.

Hina Khan Post

शुक्रवारी २९ जून रोजी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर आजाराबाबत चाहत्यांसह मित्रांना माहिती देत पोस्ट शेअर केली. हिनाला ब्रेस्टचा तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याची माहिती तिने दिली आहे. सध्या अभिनेत्रीवर आजारा संबंधित उपचार सुरू असून ती बरी आहे. या कठीण काळात तिच्या पाठीशी विशेष तिची फॅमिली उभी राहिली आणि त्यांनी तिला विशेष पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले.

हिना खान हिला "ये रिश्ता क्या कहलाता" मालिकेतून विशेष ओळख मिळाली आहे. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारली. तिच्या कॅरेक्टरचं नाव अक्षरा असं आहे. त्यानंतर हिना "बिग बॉस 11" मध्येही दिसली होती. बिग बॉसमुळेही तिला विशेष लोकप्रियता मिळाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, तिने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाल की हिरवा, निरोगी आरोग्यासाठी कोणता सफरचंद फायदेशीर?

National Awards: मराठी सिनेमाची उंच भरारी! दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'या' सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Maharashtra News Live Update: “जीआर-एफआर काढण्यापेक्षा प्रति हेक्टरी किती मदत जाहीर करता?”; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

निवडणूक आयोगाचं तात्काळ स्पष्टीकरण, १० महिन्यांत त्या १४ तक्रारी; राजकारणातही उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT