HBD Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Deepika Padukone: एकेकाळी आयुष्य संपवायचा विचार ते बॉलिवूडची 'मस्तानी', कसा होता दीपिकाचा प्रवास? संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल चकित

Deepika Padukone Net Worth : बॉलिवूडच्या मस्तानीचा आज वाढदिवस आहे. दीपिका पदुकोण कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. खूप मेहनतीने ती यशाच्या शिखरावर पोहचली आहे. तिचा प्रवास जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज 39 वर्षांची झाली आहे. दीपिकाचा आज वाढदिवस आहे. तिने आजवर आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे. गेल्या वर्ष दीपिका आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने बॉलिवूड इंडस्ट्रीत एक स्वतःची शानदार ओळख बनवली आहे.

दीपिकाने आपले मॉडेलिंगचे करिअर वयाच्या ९ व्या वर्षापासून सुरू केले. मॉडेलिंगनंतर दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून 2007 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आजवर दीपिकाने पठान, जवान, बाजीराव मस्तानी, पद्मावत, ये जवानी है दिवानी आणि चेन्नई एक्सप्रेस असे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

दीपिका पदुकोण नेटवर्थ

दीपिका पदुकोण चित्रपटांसोबतच ब्रँडमधून देखील कमाई करते. तिचा 82°E या नावाचा ब्युटी ब्रँड देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटींहून अधिक आहे. दीपिका एका चित्रपटासाठी जवळपास 15-30 कोटी रुपये घेते. दीपिकाकडे खूप आलिशान कार आहेत. अभिनेत्रीकडे मर्सिडीज मेबॅक 500, ऑडी अशा अनेक महागड्या कार आहेत. दीपिका पदुकोणचे मुंबईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.

दीपिकाचे नैराश्य

या यशाच्या काळात दीपिकाला एक वेळेसाठी खूप नैराश्य आले होते. तेव्हा तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, "तिच्या मनात एकेकाळी आयुष्य संपवायचा विचार देखील आला होता." बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतचे नाते तुटल्यावर दीपिकाला स्वत:ला सावरणे खूप कठीण झाले होते. मात्र आता दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर आपापल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहेत. दीपिकाने रणवीर सिंहसोबत आयुष्याची गाठ बांधली. तर रणबीर कपूर आता थाटात आलिया भट्ट्सोबत संसार करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT